Pune University  Sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune University : पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी (मार्च-एप्रिल २०२४) सत्राच्या परीक्षा मंगळवारपासून सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी (मार्च-एप्रिल २०२४) सत्राच्या परीक्षा मंगळवारपासून सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत. तसेच विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययनच्या बी.ए, बी.कॉम, एम.ए, एम.कॉम आणि एम.बी.ए. या अभ्यासक्रमांच्या एकूण १३ विषयांच्या परीक्षा ११ परीक्षा केंद्रावरून सकाळी आणि दुपारी सत्रात सुरू झाल्या आहेत.

तसेच विद्यापीठाच्या नियमित सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षाही सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. दरम्यान, विविध अभ्यासक्रमांचे परीक्षा अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अखेरची संधी म्हणून बुधवारपर्यंत (ता.३) परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा अर्ज भरून घेतला जाणार नाहीत.

महाविद्यालयांनी महाविद्यालय आणि संस्था स्तरावर असे परीक्षा अर्ज तपासून वैध अर्ज गुरुवारपर्यंत (ता. ४) इनवर्ड करण्यात यावेत. त्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. नियोजित वेळेत विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरावेत, यासाठी महाविद्यालय स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT