Pune University
Pune University esakal
एज्युकेशन जॉब्स

विद्यापीठ घेईल विशेष परीक्षा..! विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा

मीनाक्षी गुरव

राष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या स्पर्धेसाठी निवड झालेले, तसेच राष्ट्रीय सेवा योजना किंवा समकक्ष स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेले, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा विद्यापीठामार्फत घेण्यात येईल.

पुणे - विद्यापीठाच्या आणि अन्य परीक्षा एकाच दिवशी येणारे, राष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या स्पर्धेसाठी निवड झालेले, तसेच राष्ट्रीय सेवा योजना किंवा समकक्ष स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेले आणि त्या स्पर्धा आणि परीक्षा एकाच दिवशी असणारे, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा विद्यापीठामार्फत घेण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाने ४ जुलै रोजी परिपत्रक काढून हे स्पष्ट केले आहे. परंतु तरीही विद्यार्थी विविध मार्गाने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने पुन्हा एकदा या परिपत्रकाची आठवण विद्यार्थ्यांना करून दिली आहे. या परिपत्रकानुसार, परीक्षा एकच दिवशी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावे, याबाबत सविस्तर सूचनाही दिल्या आहेत.

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा येत्या काळात घेण्यात येत आहेत. याच काळात काही अन्य अभ्यासक्रमाच्याही परीक्षा आहेत. त्यामुळेच ज्या दिवशी विद्यार्थ्यांच्या अन्य परीक्षा आहेत अशा विद्यार्थ्यांनी सर्व पुराव्यांसह आपल्या महाविद्यालयाकडे अर्ज करावा, विद्यापीठ अशा विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेईल असे जाहीर करत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. मात्र तरीही काही विद्यार्थी यासाठी रीतसर अर्ज न करता अन्य मार्गांचा अवलंब करताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन याबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

‘विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेत विशेष परीक्षेबाबतचे विद्यापीठाने ४ जुलै रोजी परिपत्रक जाहीर केले आहे. हे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेस्थळावर देखील उपलब्ध आहे. याची माहिती न घेता विद्यार्थी वेळापत्रक बदलण्याची मागणी करत असतील तर ते योग्य नाही.’

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT