Startup टिम ई सकाळ
एज्युकेशन जॉब्स

पुणे विद्यापीठातर्फे ‘स्टार्टअप’ मार्गदर्शनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’च्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राकडून स्टार्टअपला मार्गदर्शनासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

मीनाक्षी गुरव

पुणे : नवोउद्योजकांच्या स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या स्टार्टअपसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन तसेच कायदेशीर बाबींसाठी साहाय्य करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठातील ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’च्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राकडून स्टार्टअपला मार्गदर्शनासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Startup Training In Pune University)

पुणे विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी व अन्य नागरिकांनाही या माध्यमातून आपल्या नवकल्पनांना आकार देता येणार आहे. आयटी, डीप टेक्नॉलॉजी, एज्यु टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, मटेरियल सायन्स, ॲग्रीकल्चर, मीडिया, ई-कॉमर्स, फिनटेक, इलेक्ट्रॉनिक मोबेलिटी यांसह अन्य क्षेत्रांतील प्राथमिक अवस्थेतील स्टार्टअपला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी १५ मार्च २०२२ पर्यंत मुदत विद्यापीठातर्फे देण्यात आली आहे.

हे सर्वांसाठी खुले असणार असून व्यवसायांच्या कल्पना असणाऱ्या अशा नवकल्पकांना, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप सुरू करणाऱ्या गटांना, कंपन्यांना तसेच प्राध्यापक, विद्यार्थी अशा सर्वांना यासाठी अर्ज करता येणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती विद्यापीठाच्या ‘http://iil.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT