Pune University sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune University : हिवाळी परीक्षांसाठी अर्ज प्रक्रीया सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे हिवाळी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सम्राट कदम

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे हिवाळी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संलग्न महाविद्यालयातील सत्र परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेतली जाण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने विद्यापीठाने पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे.

पुणे, नगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठातर्फे घेतली जाते. तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परीक्षा अर्ज भरून घेतले जातात. अभियांत्रिकी व आर्किटेक्चरबरोबरच विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

तसेच उरलेल्या अभ्यासक्रमांचे पुढील दोन ते तीन दिवसात भरण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीला सुरवात करण्यास हरकत नाही. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून ९० दिवसानंतरच परीक्षाचे आयोजन करता येते.

त्यानुसार विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आयोजन सुरू केले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपताच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. परिणामी प्राध्यापकांना दिवाळीपूर्वी आपला सर्व अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच हिवाळी सत्राच्या परीक्षांची सुरवात होणार आहे.काही अभ्यासक्रमांचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरवात झाली असून पुढील काही दिवसांत उर्वरित सर्व विषयांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील.

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही

Pune Crime: साखरपुड्यानंतर केतनला आलेली शंका, सियाचं बॅकग्राउंड माहितीय का? वडिलांना केलेली विचारणा पण...

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मोठी घडामोड! सुनावणीत राज्य सरकारचा युक्तिवाद; पूर्वीच्या आयोगातील त्रुटी दूर झाल्याचा दावा

Nashik Girl Death VIDEO : लस टोचून घेतल्यानंतर चक्कर येऊन पडली, 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत; दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील घटना

Karad Flyover Update : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडचा उड्डाणपूल कधीपासून सुरू होणार? तीन दिवसांची चाचणी पूर्ण; पुलावर सध्या काय काम सुरुये?

SCROLL FOR NEXT