Online-Admission Sakal
एज्युकेशन जॉब्स

अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यातून आतापर्यंत सव्वा लाख विद्यार्थ्यांनी केली ऑनलाइन नोंदणी

इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यात आतापर्यंत जवळपास सव्वा लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यात आतापर्यंत जवळपास सव्वा लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

पुणे - इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यात आतापर्यंत जवळपास सव्वा लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मुंबईमध्ये ७१ हजार ८६१ विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी झाली आहे. तर पुण्यातून ३५ हजार ८०० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

राज्यातील मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. तर उर्वरित राज्यात प्रवेश हे प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येतात. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया ३० मे पासून सुरू झाली असून आतापर्यंत एक लाख २५ हजार १८६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ३० मे पासून ऑनलाइन नोंदणी प्रवेश अर्ज भाग एक भरणे, अर्ज प्रमाणित (व्हेरीफाय)करून घेणे, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करणे आणि माहितीत बदल करणे यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा ३५ हजारांचा टप्पा आतापर्यंत आतापर्यंत पूर्ण झाला आहे. पुण्यात तब्बल १७ हजार ३३० विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले आहेत. तर १३ हजार २८७ अर्जांची पडताळणीही पूर्ण झाली आहे.

राज्य मंडळातर्फे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन मधून कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती नोंदविता येणार आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी, माहिती तपासून अंतिम करणे, माहितीत दुरुस्ती करणे, महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून व्हेरीफाय करणे ही प्रक्रिया देखील सुरू आहे.

इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा आढावा :

तपशील : पुणे : मुंबई : नागपूर : नाशिक : अमरावती

ऑनलाइन नोंदणी : ३५,८०० : ७१,८६१ : ८,११५ : ६,५२३ : २,८८७

लॉक केलेले अर्ज : १७,३३० : ३४,२२६ : ४,६२० : ३,६४१ : २,१७२

पडताळणी झालेले (व्हेरीफाय) अर्ज : १३,२८७ : २६,०९० : ३,१२९ : २,२३८ : १,०६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT