Railway Recruitment google
एज्युकेशन जॉब्स

Railway Recruitment : नव्या वर्षात १ लाखांहून अधिक तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरी

आरआरबी ग्रुप डी सीबीटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आरआरबीच्या संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहाता येईल.

नमिता धुरी

मुंबई : २०२२ हे वर्ष सरताना रेल्वेने भारतीय तरुणांना एक आनंदाची बातमी दिली आहे. नव्या वर्षात १ लाख तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. रेल्वे भरती मंडळाने रेल्वे ग्रुप डी भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यात ३ लाख उमेदवार पात्र ठरले आहेत.

आरआरबी ग्रुप डी सीबीटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आरआरबीच्या संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहाता येईल.

पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील महिन्यात शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल. पीईटी आणि वैद्यकीय चाचणी जानेवारी २०२३मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर जूनमध्ये १ लाख उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले जाईल.

ग्रुप डी लेव्हल १ सीबीटी परीक्षा ५ टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा ४००हून अधिक परीक्षा केंद्रांवर १५ भाषांमध्ये घेण्यात आली. या भरतीसाठी १ कोटी १० लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. यातून निवड झालेल्या उमेदवारांना इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, हेल्पर, असिस्टंट, पॉइंट मन या पदांवर नियुक्त केले जाईल.

नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीची भरती प्रक्रिया मार्च २०२३पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. लेव्हल ४चा अंतिम निकाल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये डीवी आणि वैद्यकीय चाचणी होईल. मार्चमध्ये उमेदवार नोकरीत रुजू होतील.

या दरम्यान लेव्हल ४चाही अंतिम निकाल जाहीर होईल. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंतर्गत ३५ हजार तरुणांना रेल्वेत नोकरी दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT