Railway Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

Railway Recruitment : रेल्वे भरती प्रक्रियेसाठी वार्षिक कॅलेंडर जाहीर! वर्षातून चार परीक्षा घेतल्या जाणार

रेल्वे भर्ती मंडळाने या वर्षीच्या रेल्वे भरती भरती परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - रेल्वे भर्ती मंडळाने या वर्षीच्या रेल्वे भरती भरती परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. रेल्वेने एसएससी आणि यूपीएससी प्रमाणे वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेकडे केली होती. त्यानुसार रेल्वेने हे कॅलेंडर रेल्वेने प्रसिद्ध केले असून यात वर्षभरात घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आल्या आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेतील भरती संदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेमुळे रेल्वे भरती प्रक्रियेला गती मिळेल आणि विहित प्रवर्गासाठी विहित मुदतीत परीक्षा घेता येईल. जेणेकरून रेल्वे भरती परीक्षेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना पूर्वनिश्चित पद्धतीने परीक्षेच्या अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार आहे.

नव्या वार्षिक कॅलेंडरनुसार, टेक्निशियनची भरती एप्रिलमध्ये, एनटीपीसी भरती जूनमध्ये आणि लेव्हल-१ भरती ऑक्टोबरमध्ये होणार आहे. एप्रिलमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू नये म्हणून यंदा तंत्रज्ञांची भरती फेब्रुवारीमध्ये केली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

रेल्वे भरती कॅलेंडर २०२४ -

असिस्टंट लोको पायलटची भरती जानेवारी-मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत तंत्रज्ञ पदांसाठी भरती होणार आहे. यानंतर, जुलै-सप्टेंबरमध्ये, नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी एनटीपीसी पदवी स्तर ४, ५, ६ साठी भरती होईल. या कालावधीत, रेल्वे कनिष्ठ अभियंता आणि पॅरामेडिकल श्रेणीसाठी देखील भरती केली जाईल. तसेच रेल्वे श्रेणी -१(ग्रुप डी भरती) आणि मंत्री आणि पृथक श्रेणीची भरती ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात होणार आहे.

वार्षिक कॅलेंडरचे फायदे

- जर उमेदवार एका संधीत पात्र ठरला नाही तर भविष्यात त्याच्यासाठी अधिक संधी असणार

- प्रत्येक वर्षी पात्र ठरलेल्या उमेदवारांना समान संधी असतील.

- निवडलेल्यांना उत्तम करिअर प्रमोशनची शक्यता असेल.

- निवड प्रक्रिया, प्रशिक्षण आणि नियुक्त्या जलद केल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT