रेल्वेमध्ये 400 हून अधिक प्रशिक्षणार्थी पदांची होणार भरती! 'असा' करा अर्ज  Canva
एज्युकेशन जॉब्स

रेल्वेमध्ये 400 हून अधिक प्रशिक्षणार्थी पदांची होणार भरती!

रेल्वेमध्ये 400 हून अधिक प्रशिक्षणार्थी पदांची होणार भरती! 'असा' करा अर्ज

श्रीनिवास दुध्याल

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्‍सच्या वतीने (सीएलडब्ल्यू) अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सोलापूर : जर तुम्ही रेल्वेमध्ये (Railway) नोकरी (Jobs) शोधत असाल तर ही तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्‍सच्यावतीने (Chittaranjan Locomotive Works - CLW) अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या अंतर्गत एकूण 492 CLW पदांची भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे कोणतेही इच्छुक उमेदवार CLW च्या clw.indianrailways.gov.in या अधिकृत साइटवर अधिसूचना तपासू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्‍टोबर 2021 पर्यंत आहे.

CLW द्वारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्जदारांनी apprenticeshipindia.org यामध्ये नोंदणी करावी आणि सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत. नियुक्तीच्या वेळी याची पडताळणी केली जाईल. यानंतरच नोंदणीची प्रक्रिया सत्यापित केली जाईल. अर्ज करताना उमेदवाराने सर्व कॉलम काळजीपूर्वक वाचले पाहिजेत आणि त्यानुसार अर्ज केला पाहिजे; कारण जर फॉर्ममध्ये काही विसंगती आढळली तर दुसरी संधी दिली जाणार नाही.

रिक्त पदांचा तपशील

फिटर - 200, टर्नर - 20, मशिनिस्ट - 56, वेल्डर - 88, इलेक्‍ट्रिशियन - 112, एससी मेकॅनिक्‍स - 4, पेंटर - 12

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10+2 परीक्षा पद्धतीत दहावी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.

अशी होईल निवड

या निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत / तोंडी परीक्षा होणार नाही. पोर्टलमध्ये दिलेल्या दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे व गुणवत्ता यादीच्या आधारे प्रशिक्षणार्थीची नियुक्ती केली जाईल. अशा शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कॉल लेटर जारी करून नोंदणीकृत ई-मेल आणि मोबाईल क्रमांकाद्वारे सूचित केले जाईल. त्याचवेळी, या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT