उत्पादकता दर कोणत्याही उद्योगाची कार्यक्षमता सूचित करतो. कार्यक्षमतेत उच्चतम अचूकता व संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन (TQM) या घटकांना जागतिक बाजारपेठेत सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे.
- राजेश ओहोळ
शिक्षणातील Theory has no fruit without practical and pratical has no root without theory या तत्त्वानुसार मूलभूतशास्त्र व अभियांत्रिकी यांचा संबंध स्पष्ट होतो. शास्त्र तंत्रज्ञानामध्ये मूलभूत शास्त्र आणि अभियांत्रिकी यांच्या अन्योन्य संबंधांतून नवीन शोध, संकल्पना किंवा हायपोथिसिस यांचे यशस्वीरीत्या उपयोजन करता येते, तसेच प्रत्येक वस्तू प्रणाली किंवा सेवा यांच्या निर्मितीसाठी मूलभूतरीत्या आवश्यक ठरणाऱ्या संशोधन आणि विकास, उत्पादन व गुणवत्ता आश्वासन यासारख्या क्षेत्रांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो.
उत्पादकता दर कोणत्याही उद्योगाची कार्यक्षमता सूचित करतो. कार्यक्षमतेत उच्चतम अचूकता व संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन (TQM) या घटकांना जागतिक बाजारपेठेत सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे. परिणामी संशोधन आणि विकास, उत्पादन व गुणवत्ता आश्वासन यामध्ये कॉम्प्युटरायझेशन आणि ऑटोमेशन या पर्यायांचा स्वीकार करणे हे सर्वच क्षेत्रांना अपरिहार्य ठरत आहे. अशा तऱ्हेने उत्पादन, सेवा व्यापार या उद्योगांच्या सर्व टप्प्यांमध्ये माहिती-तंत्रज्ञानाचा शिरकाव होऊन माहिती तंत्रज्ञान वा शब्द सर्वपरिचित झाला.
शिक्षणाचा योग्य उपयोग
कॉम्प्युटरायझेशन आणि ऑटोमेशन यांची सर्वच ठिकाणी उपयुक्तता मौल्यवान ठरली असली तरी कुठल्याही वस्तू किंवा सेवा यांची नवनिर्मिती मूलभूतशास्त्र उपयोजित शास्त्र यांच्या अधिष्ठानाविना प्रत्यक्षात होऊ शकत नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय अथवा विद्यापीठ यांचे शिक्षण सध्याच्या बाजारपेठेत रोजगार प्राप्तीस तोडके ठरू शकते. त्यामुळे आपण घेतलेल्या शिक्षणात माहिती-तंत्रज्ञानाचा कशा तऱ्हेने वापर होत आहे आणि आपण कितपत योग्य ठरतो याचा विचार आवश्यक आहे. पारंपरिक शिक्षणासोबत कुशलता वाढविणारे स्वतःच्या शिक्षणाशी निगडित माहिती-तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शिकणे ही रोजगारासाठी वाढीव अथवा अपेक्षित पात्रता ठरू शकते.
उपयुक्त अभ्यासक्रम
माहिती-तंत्रज्ञानाचे ज्ञान देणारे वेगवेगळे अभ्यासक्रम खासगी छोट्या-मोठ्या संस्था देताहेत, नेमका कुठला अभ्यासक्रम भविष्यातील रोजगाराला उपयुक्त ठरणार, याची विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना असणे जरुरीचे आहे. तसेच असे अभ्यासक्रम सरकार मान्य आहे की नाही याची शहानिशा होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. डीओईएसीसी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड अॅक्रिडिटेशन ऑफ कॉम्प्युटर कोर्सेस या भारत सरकारच्या विभागाद्वारे कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना मंजुरी मिळते. डीओईएसीसी मंजूर कॉम्प्युटर अभ्यासक्रम हा सरकारी नोकरीसाठी पात्र ठरवणारा असतो. सी-डॅक मान्यताप्राप्त अभ्यासक्रम पुष्कळशा संस्था असे वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रताधारकांना उपलब्ध करून देतात. अशा संस्थांतील अभ्यासक्रम उमेदवारांच्या ठरावीक शैक्षणिक पात्रतेत वाढ करणारे ठरतात.
पुढील सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर निगडित रोजगार किंवा उच्च शिक्षणासाठी या वाढीव पात्रतेचा निश्चितच उपयोग होतो. खूप प्रकारचे वेगवेगळ्या नावाखाली कॉम्प्युटरचे अभ्यासक्रम सर्वत्र उपलब्ध असले तरी डीओईएसीसी/सी-डॅक अथवा सरकार मान्यताप्राप्त राज्य व नियंत्रित अभ्यासक्रमांना पसंती देणे हे कधीही हितकारक आहे. वर्ग-‘अ’ ते वर्ग-‘स’ या संवर्गामध्ये मोडणाऱ्या पदांकरिता कॉम्प्युटर साक्षरता अभ्यासक्रम म्हणजे एमएस-सीआयटी अभ्यासक्रम प्रमाणपत्राची अट सर्व अर्जदारांना बंधनकारक केली आहे. केंद्र सरकारच्या निरनिराळ्या मंत्रालय/विभाग अखत्यारित येणाऱ्या वर्ग-‘स’मध्ये मोडणाऱ्या कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, सहायक, कार्यालय अधीक्षक आदी पदांकरिता अर्ज उमेदवारांसाठी ठराविक कॉम्प्युटर साक्षरता दर्जा प्रमाणपत्र अभ्यासक्रम निश्चित केला आहे. खासगी क्षेत्रात तर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वेगवेगळे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांची सर्रास मागणी पहावयास मिळते. अशा तऱ्हेने दहावी बारावी म्हणा किंवा महाविद्यालयीन/विद्यापीठ शिक्षणानंतर कॉम्प्युटर अभ्यासक्रमाची आवश्यकता अनिवार्य बनली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.