Abroad Education Sakal
एज्युकेशन जॉब्स

परदेशात शिकताना... : आरोग्याचे आणि रोजगाराचेही ‘साधन’

नागरिकांना दीर्घकाळ आणि आरोग्यसंपन्न जगता यावे यासाठी आरोग्यशास्त्राने खूप पावले उचलली आहेत.

राजीव बोस

नागरिकांना दीर्घकाळ आणि आरोग्यसंपन्न जगता यावे यासाठी आरोग्यशास्त्राने खूप पावले उचलली आहेत. रुग्णालये ही आरोग्यविषयक काळजी, उपचार, निदान आदी गोष्टींसाठी अतिशय उपयुक्त असली, तरी रुग्णालयांतील उपचार हा खूप महाग असतो. जगभरात ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या सातत्याने वाढत असतानाच लोकांनी आरोग्यसंपन्न जगावे यासाठी आपल्याला ठोस ‘सोल्युशन्स’ शोधणे गरजेचे आहे. कोरोना काळाने आपल्या सगळ्यांनाच अक्षरशः गुडघ्यावर रांगायला लावले असतानाच, आपण रुग्णालयातील उपचारांच्या खर्चांचे वाढणारे आकडेही बघितले आहेत. त्यामुळे आरोग्यविषयक तंत्रज्ञान आणि साधने, उपकरणे फार महत्त्वाची ठरणार आहेत.

स्मार्ट होम तंत्रज्ञान चमत्कार घडवून आणत असले, तरी विविध सेवा आणि निदान यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी सुरू असलेल्या संशोधन कामासाठी अधिकाधिक वैयक्तिक आरोग्य-माहिती असलेला डेटा (पर्सनलाइज्ड डेटा) यापुढच्या काळात आवश्यक ठरणार आहे. इंटरनेट ऑफ थिंग्जने (आयओटी) पाठबळ दिलेली एंबेडेड टेक्नॉलॉजी-आधारित मॉनिटरिंग इक्विपमेंट्स म्हणजे देखरेख साधने आरोग्यविषयक स्थितीवर फक्त देखरेखच ठेवतात असे नाही, तर त्या त्या व्यक्तीच्या आरोग्यस्थितीनुसार योग्य मात्रा असलेल्या औषधांच्या मात्रासुद्धा आपोआप देऊ शकतात.

त्यामुळेच पुढच्या पिढीसाठी वेअरेबल डिव्हायसेस म्हणजे शरीरावर धारण करता येतील अशी साधने ही मानव-संगणक संवाद, संप्रेषण, गणना, निदान यांसारख्या अनेक गोष्टींसाठी सज्ज असतील एवढेच नव्हे, तर त्यांच्यामध्ये मर्यादित स्रोत आणि विद्युत ऊर्जा याही गोष्टी असलेली छोटी उपकरणे असतील यांसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठी संधी असणार आहे.

एंबेडेट सिस्टिम्स डिझाइनमधील पदव्युत्तर पदवी घेतल्यास औद्योगिक संशोधकांना करिअरची ‘सुवर्णसंधी’ असून, नेटवर्क ऑटोमेशन, रिअल-टाइम मशिन यांसारख्या बहुविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळणार आहे. जे विद्यार्थी डेटा सायन्समध्येही शिक्षण घेतील, त्यांना अधिक स्कोप असून, ते नेटवर्क सायन्समध्ये; तसेच वाहतूक, वित्त आणि सोशल नेटवर्क्स यांच्यासारख्या काँप्लेक्स सिस्टिम्सच्या विश्लेषणातही करिअरच्या शक्यता धुंडाळून बघू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT