Abroad Education Sakal
एज्युकेशन जॉब्स

परदेशात शिकताना... : सेंटिमेंट ॲनॅलिसिसद्वारे नोकरीच्या नव्या संधी

आज तंत्रज्ञानाने छोट्यातील छोट्या घराला व्यापून टाकले आहे. बहुतांश नागरिक आज घरात लागणाऱ्या मूलभूत गोष्टी खरेदी करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंगवर अवलंबून राहात आहेत.

राजीव बोस

आज तंत्रज्ञानाने छोट्यातील छोट्या घराला व्यापून टाकले आहे. बहुतांश नागरिक आज घरात लागणाऱ्या मूलभूत गोष्टी खरेदी करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंगवर अवलंबून राहात आहेत. त्यामुळेच ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये मोठी भरभराट पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावर एखाद्या ब्रॅण्डविषयी रंगणाऱ्या चर्चांचे वाढलेले प्रमाण या कंपन्यांना त्यांना हवा असलेला ‘बिग डेटा’ मिळवून देतात. यातून त्यांना ग्राहकांच्या मनात वस्तू विकत घेण्यासंदर्भात नक्की काय भावना आहेत, हे समजते व ग्राहकांची मते जाणून घेत उत्पादन व सेवेमध्ये आवश्यक बदल करण्यासंदर्भात त्यांना धोरणे आखता येतात. सध्या हेल्थकेअर या क्षेत्रात होत असलेल्या व्हर्च्युअल दळणवळणामुळे मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन माहिती गोळा होते आहे. यामध्ये पर्सनल ब्लॉग, सोशल मीडिया आणि वेबसाइट्स यांच्या माध्यमातून समोर येणारे चित्र शास्त्रीयदृष्ट्या योग्य नसते. या अनिश्चिततेवर मात करण्यासाठी सेंटिमेंट अॅनालिसिस (एसए) या विषयावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. यात ग्राहकांच्या मतांचे संगणकीय विश्लेषण, त्यांच्या उत्पादनाबद्दलच्या भावना व त्यांची व्यक्तिनिष्ठता यांचा संशोधनात समावेश होते.

ग्राहकांच्या ब्रॅंडविषयीच्या भावना अधिक खोलवर जाऊन जाणून घेतल्याने व त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेतल्याने भावी ग्राहकांना उत्पादनाविषयीचे व्यक्तिगत अनुभव व संदेश जाणून घेता येतात. यामुळे कंपन्यांना त्यांच्या बाजारपेठेचे ग्राहकांचे वय, लिंग, आर्थिक स्तर यांद्वारे विश्लेषण करता येतेच, त्याच्या जोडीला ग्राहकांच्या भावनांच्या आधारेही विश्लेषण करता येते. या व्यवसायात होत असलेली मोठी उलाढाल पाहता या क्षेत्रातील तज्ज्ञांना भविष्यात मोठी मागणी असणार आहे. यासाठी सॉफ्टवेअर क्षेत्रातील चांगले शिक्षण आवश्यक आहे, त्याचबरोबर आता इतर विविध शाखांतील विद्यार्थीही या क्षेत्रातील सखोल ज्ञान मिळविण्यासाठी पुढे येत आहेत. कॉम्प्युटर सायन्समधील मास्टर्स डिग्री या क्षेत्रातील यशासाठीचा महत्त्वाचा मार्ग आहे. याशिवाय जीआरई, टोफोल, ४ वर्षांचा अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रम आणि काही चांगल्या सॉफ्टवेअर्सचे ज्ञान या आवश्यक गोष्टी आहेतच. तेव्हा, नोकरीच्या या नव्या संधी तुम्हाला साद घालत आहेत. त्या हस्तगत करा, बाजारपेठेची गरज ओळखून त्यांना सेवा द्या आणि मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवायला सज्ज व्हा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT