Abroad Education Sakal
एज्युकेशन जॉब्स

परदेशात शिकताना... : सिग्नल प्रोसेसिंग आणि करिअर

आपल्या दैनंदिन आयुष्यात सिग्नल प्रोसेसिंग तंत्रज्ञानाला खूपच मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

राजीव बोस

आपल्या दैनंदिन आयुष्यात सिग्नल प्रोसेसिंग तंत्रज्ञानाला खूपच मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

आपल्या दैनंदिन आयुष्यात सिग्नल प्रोसेसिंग तंत्रज्ञानाला खूपच मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, आपले आयुष्य कोणताही अडथळा न येता पुढे सरकण्यासाठी ते आवश्‍यक असले, तरी ते दिसत नसल्याने आपले त्याच्याकडे अजिबात लक्ष जात नाही. हे तंत्रज्ञान अत्यंत अचूक आकड्यांची गरज असलेल्या तुमच्या हृदयाचे ठोके मोजण्यासारख्या कामांसाठी वापरले जाते. यासाठी स्मार्टफोन किंवा मनगटावर परिधान करणाऱ्या घडाळ्यासारख्या उपकरणाचा उपयोग केला जातो. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल, कारण जगभरात अशा प्रकारे मनगटावर घालण्यासाठीची उपकरणे बनवणारे १३२ ब्रॅण्ड असून, त्यंच्याद्वारे ४२३ अशी उत्पादने बाजारात दाखल झालेली आहेत. त्यामध्ये आपल्या देशात फिटबिट, ॲपल, मिसफिट अशा अनेक कंपन्यांचा समावेश होतो.

शरीरावर वापरता येण्याजोगी ही उपकरणे रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. त्याच्याजोडीला मेडिकल इमेजिंग सिस्टिम डॉक्टरांसाठी एखाद्या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होण्याआधीच त्याचा मागोवा घेण्यासाठी खूप उपयोगी ठरतो. गेल्या काही वर्षांत डीप लर्निंगवर आधारित मॉडेल्सचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये इमेज आणि व्हिडिओ सुपर-रिझोल्युशनसारख्या इमेजिंग प्रॉब्लेसचा, तसेच इमेज रिस्टोरेशनसारख्या गोष्टींचा समावेश होतो. हे मशिन लर्निंग या स्पर्धात्मक क्षेत्रातील सर्वाधिक वापर होत असलेले तंत्रज्ञानही ठरत आहे. त्यातून अत्यंत गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. काही ठिकाणी या मशिन्स मानवी बुद्धिमत्तेलाही मागे टाकत प्रश्‍नांची उकल करीत आहेत. डेटा लर्निंग या तंत्राचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, तो खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरील डेटा वाचण्यासाठी उपयुक्त ठरतो.

जग स्मार्ट सिटीच्या आणि स्मार्ट घरांच्या दिशेने प्रवास करीत असताना, घरातील उपकरणे मानवी हस्तक्षेपाविना एकमेकांशी संवाद साधतील. अशा प्रकारची स्वायत्त शहरे विविध प्रयोगांसाठीची एक मोठी प्रयोगशाळाच ठरणार आहेत. यामुळे भविष्यात इनोव्हेटिव्ह पद्धतीने काम करणाऱ्या आणि मोठे तंत्रकौशल्य असणाऱ्या संशोधकांना व त्यापद्धतीने स्वतःला विकसित केलेल्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी असणार आहे. सिग्नल प्रोसेसिंग व मशिन लर्निंगच्या क्रांतीचा भाग होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातील मूलभूत ज्ञान आत्मसात करणे आणि त्यासाठीची तयार करणे अनिवार्य आहे.

आपण या सदरामध्ये परदेशात व विशेषतः अमेरिकेत शिक्षणाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठीचे नियम कोणते, शैक्षणिक पात्रता काय हव्यात, स्कॉलरशीप, होस्टेलसारख्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, राहण्यासाठी, शिक्षणसाठी किती खर्च येतो यांबद्दल माहिती घेतलीच. त्याचबरोबर भविष्यात वेगाने पुढे येणारी क्षेत्रे कोणती व त्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करावी याबद्दलही माहिती घेतली. (Article About Abroad Education)

(समाप्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT