experience 
एज्युकेशन जॉब्स

इम्प्रूव्ह युअरसेल्फ; अनुभवाचा आदर महत्त्वाचा!

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर

एके दिवशीची गोष्ट. मला शिलाई मशिनची मोटार दुरुस्त करायची होती. शिलाई मशिनने माझ्या हृदयात स्थान मिळविलेय. ती अगदी माझ्या जन्मापूर्वी घरात आली. त्यामुळे मला तिच्याबद्दल किती प्रेम वाटत असेल, याची तुम्ही कल्पना करा. जवळचा मेकॅनिक शोधण्यासाठी मी गुगलवर सर्च केला आणि मशिन दुरुस्त करण्यासाठी निघालो.

मुख्य मार्केटमध्ये एका कोपऱ्यावरील दुकानात एक तरुण मेकॅनिक काम करत होता. त्याने माझ्याकडे पाहून ‘काय हवेय’, असे विचारले. मी शिलाई मशिनची मोटर दाखवली. तो मोटारीकडे पाहून म्हणाला, ‘‘केबल बदलावीच लागेल. तुम्ही उद्या संध्याकाळी या.’’ मात्र, मला दुसऱ्या दिवशी प्रवास करायचा होता. त्यामुळे मशिन लगेच दुरुस्त करून हवी होती. मी त्याला म्हणालो, ‘‘तुझ्यासारखा तज्ज्ञ या मशिनची दुरुस्ती दहा मिनिटांतच करेल. त्यावर तो म्हणाला, ‘‘मी पाहतो. मशिन दुरुस्त करणे शक्य असेल तर प्रयत्न करतो. दुरुस्तीला १८० रुपये लागतील.’’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मी त्याचे आभार मानून घरी येण्यासाठी परत निघालो. तितक्यात तो म्हणाला, ‘‘तुमची मोटर कितपत काम करेल, याची मी खात्री देऊ शकत नाही.’’ त्यावर मी त्याला म्हणालो, ‘‘मग मी ही मोटार तुझ्याकडे दुरुस्तीला का टाकावी?’’ मी माझी मोटार परत घेतली. त्या परिसरातील सर्वोत्तम मेकॅनिकला आपल्याच कामाची खात्री नव्हती. तिथून निघालो. बाजारपेठेत आणखी काही चौकशी केल्यावर आतील भागातील एका दुकानाबद्दल मला समजले. मी तिथे पोचलो. तिथे एक वृद्ध मेकॅनिक पंखा दुरुस्त करत होता. स्मितहास्य आणि माझे स्वागत केले. मी त्याला मशिनबद्दल सांगितले. लगेच मोटार घेऊन ती तपासली. काही वायर बदलल्या. अवघ्या पाच मिनिटांत दुरुस्ती झाली. त्यानंतर त्याने मोटार सुरू करूनही दाखवली. माझ्याकडून फक्त चाळीस रुपये घेतले. आधीच्या मेकॅनिकने सांगितलेल्या रकमेच्या तुलनेत ही रक्कम फक्त २५ टक्के होती. तो साधा मनुष्य अतिशय अनुभवी, कसलाही अहंकार नसलेला खराखुरा व्यावसायिक वाटला. अनुभव महत्त्वाचा असतो आणि त्याचा आदर करायला हवा. तुम्हाला काय वाटते?

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT