RIMC Entrance Eligibility Test for Students in Maharashtra sakal
एज्युकेशन जॉब्स

RIMC Entrance Exam : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील प्रवेशाची पात्रता परीक्षा आता ८ जूनला

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा’ (आरआयएमसी) आता ८ जून २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा’ (आरआयएमसी) आता ८ जून २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये इयत्ता आठवीसाठी ही प्रवेश पात्रता परीक्षा आहे. परीक्षेसाठी या आधी १ जून ही तारीख देण्यात आली होती. परंतु आता १ जून ऐवजी परीक्षा ८ जून रोजी होणार आहे.

देशातील १ जून रोजी आठ राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदार होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा १ जून ऐवजी ८ जून रोजी घेण्यात येईल, अशी सूचना राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजचे (आरआयएमसी) कमांडंट यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ‘www.rimc.gov.in’ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

परीक्षेचे सुधारित वेळापत्रक -

- शनिवार, ८ जून २०२४

आरआयएमसी परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक -

विषय : वेळ : गुण

गणित : सकाळी ९.३० ते ११ : २००

सामान्य ज्ञान : दुपारी १२ ते १ : ७५

इंग्रजी : दुपारी २.३० ते ४.३० : १२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, चिंचपोकळीचा चिंतामणीही मार्गस्थ

Govinda Komkar : वनराजच्या अंत्यविधीलाच टोळीनं घेतलेली शपथ, १९ वर्षीय मुलाला गोळ्या घातल्या; नाना पेठेत काय घडलं?

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : कल्याणमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरली

SCROLL FOR NEXT