Broadcast Engineering Consultants India Limited esakal
एज्युकेशन जॉब्स

'ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्‌स'मध्ये MTS व इतर पदांची भरती!

'ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्‌स'मध्ये एमटीएस अन्‌ इतर पदांची भरती!

सकाळ वृत्तसेवा

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्‌स इंडिया लिमिटेडने MTS, हाउसकीपिंग, सुपरवायझर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

सोलापूर : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्‌स इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultants India Limited - BECIL) ने MTS, हाउसकीपिंग, सुपरवायझर पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत एकूण 55 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये मल्टिटास्किंग स्टाफच्या 32, हाउसकीपिंग आणि सुपरवायझरच्या 20 पदांची भरती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे, ते इच्छुक आणि पात्र उमेदवार becil.com या BECIL च्या अधिकृत साइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे, त्यामुळे वेळेत अर्ज करा, कारण शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

या तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख : 24 नोव्हेंबर 2021

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 डिसेंबर 2021

हे असेल अर्जाचे शुल्क

Broadcast Engineering Consultants India Limited च्या वतीने पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, OBC आणि महिला उमेदवारांना 750 रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागतील. तर SC / ST आणि EWS / PH श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क रु. 450 आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया शुल्काचे ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल. डिमांड ड्राफ्ट, चेक, मनी ऑर्डर, पोस्टल ऑर्डर, पे ऑर्डर, बॅंकर्स चेक, पोस्टल स्टॅम्प आदी नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया शुल्कासाठी स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध अधिसूचना तपासू शकतात. वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांची पात्रता वेगवेगळ्या आहेत.

तसेच हे नोंद घ्यावे की, अर्ज भरताना उमेदवारांनी स्कॅन केलेली कागदपत्रे जसे की फोटो, स्वाक्षरी, जन्म प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्‍यक आहे. उमेदवारांनी आधी पैसे भरावेत आणि शेवटच्या तारखेची वाट पाहू नये, असा सल्ला दिला जातो. त्याच वेळी, या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT