CRPF sakal
एज्युकेशन जॉब्स

Job Alert : CRPF मध्ये तब्बल १.३० लाख जागांवर भरती; ७० हजारांपर्यंत मिळणार पगार

मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नोटीसनुसार, कॉन्स्टेबलच्या एकूण १ लाख २९ हजार ९२९ जागांवर भरती केली जाणार आहे.

नमिता धुरी

मुंबई : CRPF मध्ये मोठी भरती होणार आहे. या भरती मोहिमेद्वारे, कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदाच्या एकूण १.३० लाख जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.

गृह मंत्रालयाने या संदर्भात नोटीस प्रसिद्ध केली आहे. मात्र, अर्ज सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रीय राखीव पोलीस दलातील ही पदे थेट भरतीद्वारे भरली जातील. (recruitment in CRPF on 1.30 lakh post job for 10th pass ) हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

रिक्त जागांचा तपशील

मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नोटीसनुसार, कॉन्स्टेबलच्या एकूण १ लाख २९ हजार ९२९ जागांवर भरती केली जाणार आहे. यापैकी १ लाख २५ हजार २६२ जागा पुरुष उमेदवारांसाठी तर ४ हजार ४६७ जागा महिला उमेदवारांसाठी आहेत.

यासोबतच माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कॉन्स्टेबल पदावर माजी अग्निविरांची नियुक्ती केली जाईल.

अर्ज कोण करू शकतो ?

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण केलेले असावे. त्यांच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास १८ ते २३ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. तपशीलवार माहिती सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर मिळू शकते.

निवड कशी होईल ?

या पदांसाठी उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल.

पुढील टप्प्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच ते परीक्षेच्या पुढील टप्प्यात बसू शकतील.

इतका पगार मिळेल

या पदांसाठी प्रोबेशन कालावधी २ वर्षांचा असेल आणि या दरम्यान त्यांना वेतन मॅट्रिक्सनुसार २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये पगार मिळेल. अर्ज सुरू होण्याच्या तारखांबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सविस्तर नोटीस लवकरच प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे. कोणत्याही विषयावर तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी वेळोवेळी CRPF ची अधिकृत वेबसाइट crpf.gov.in तपासत राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT