IIT GOOGLE
एज्युकेशन जॉब्स

IIT Job : आयआयटीमध्ये प्राध्यापकांची भरती; १ लाखांहून अधिक पगार घेण्याची संधी

अंतिम तारखेपूर्वी इच्छुक उमेदवारांनी सर्व तपशील व्यवस्थित भरून अर्ज सादर करावेत, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

नमिता धुरी

मुंबई : IIT इंदौरने सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांसाठी भरती काढली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंदौरने अधिकृत वेबसाइटवर एकूण ३४ प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. (recruitment in IIT Indore on assistant professor post teaching jobs )

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार IIT.ac.in या IIT इंदौरच्या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२३ आहे. हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अंतिम तारखेपूर्वी इच्छुक उमेदवारांनी सर्व तपशील व्यवस्थित भरून अर्ज सादर करावेत, असे संस्थेने स्पष्ट केले आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच, अर्जातील कोणतीही अस्पष्ट माहिती किंवा चुकीचे तपशील फॉर्म नाकारण्यास कारणीभूत ठरतील.

https://www.iiti.ac.in/public/storage/recruitments/March2023/mFvckMgWJnbbfsYS4eHO.pdf या लिंकवर अधिसूचना उपलब्ध आहे.

वयोमर्यादा

अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ३२ वर्षे असावे. याशिवाय उमेदवारांकडे संबंधित विषयात पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहावी.

सहाय्यक प्राध्यापक ग्रेड १ च्या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा किमान वेतन १ लाख १ हजार ५०० रुपये आणि सहाय्यक प्राध्यापक ग्रेड २ वेतनासाठी ७० हजार ९०० रुपये दिले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT