Job Alert
Job Alert google
एज्युकेशन जॉब्स

Job Alert : NCERTमध्ये मोठी भरती; या तारखेला करता येणार अर्ज

नमिता धुरी

मुंबई : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने मागील सर्व भरती रद्द करून नवीन भरतीची जाहिरात जारी केली आहे. ज्या अंतर्गत ३४७ अशैक्षणिक पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

भरती अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. (recruitment in NCERT government job alert) हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

भरती तपशील

अधिसूचनेनुसार, NCERT द्वारे एकूण ३४७ पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये स्तर २-५ साठी २१५, स्तर ६-८ साठी ९९ आणि स्तर १०-१२ साठी ३३ पदे आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची पात्रता वेगळी आहे.

२०१८च्या सर्व भरती रद्द

NCERT ने २० जानेवारी २०१८ ते ६ ऑगस्ट २०२२ दरम्यान गैर-शैक्षणिक अंतर्गत जाहिरात केलेल्या ८ भरती रद्द केल्या आहेत. अधिसूचनेनुसार, LDC, Junior HT सह अनेक पदांवर भरती केली जाणार नाही. या रिक्त जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परत केले जाईल.

NCERT भरतीसाठी येथे अर्ज करा

सर्वप्रथम ncert.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

त्यानंतर NCERT रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.

यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.

फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर फी सबमिट करा आणि अंतिम सबमिट बटणावर क्लिक करा.

यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT