Job Alert google
एज्युकेशन जॉब्स

Job Alert : १० उत्तीर्णांसाठी मोठी संधी; 'यंत्र इंडिया'मध्ये ५ हजार जागांवर भरती

या रिक्त पदांसाठी उमेदवाराचे वय १५ पेक्षा कमी आणि २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. ३० मार्च २०२३ पासून वयाची गणना केली जाईल.

नमिता धुरी

मुंबई : Yantra India Limited ने १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती सुरू केली आहे. या भरती मोहिमेद्वारे शिकाऊ उमेदवारांच्या एकूण ५ हजार ३९५ जागा भरण्यात येणार आहेत.

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता आणि इच्छा आहे ते विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन असेल, ज्यासाठी उमेदवारांना recruit-gov.com या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. याशिवाय इतर कोणत्याही माध्यमातून किंवा ऑफलाइनद्वारे केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण ? (recruitment in Yantra India Limited job for 10th pass ITI holders)

Yantra India Limited मध्ये शिकाऊ पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

या रिक्त पदांसाठी उमेदवाराचे वय १५ पेक्षा कमी आणि २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. ३० मार्च २०२३ पासून वयाची गणना केली जाईल. पात्रतेशी संबंधित इतर तपशील जाणून घेण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासू शकता.

निवड कशी होईल ?

या पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. शैक्षणिक पात्रतेनुसार म्हणजेच दहावीच्या गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ज्या उमेदवारांचे नाव या गुणवत्ता यादीत असेल त्यांना पुढील प्रक्रियेसाठी म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

गुणवत्ता यादीत येण्याचा किंवा DV फेरीसाठी बोलावले गेले याचा अर्थ तुमची निवड झाली असा होत नाही.

पगार आणि शेवटची तारीख काय आहे ?

या भरतीसाठी निवड झाल्यावर, पदानुसार वेतन दिले जाते. सर्वसाधारणपणे, दरमहा ६ हजार आणि ७ हजार रुपये मानधन दिले जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ एप्रिल २०२३ आहे.

अर्ज करण्यासाठी २०० रुपये शुल्क भरावे लागेल. इतर तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही yantraindia.co.in ला भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT