NCRTC करतेय ऑपरेशन्स व मेंटेनन्स स्टाफची भरती! Canva
एज्युकेशन जॉब्स

NCRTC करतेय ऑपरेशन्स व मेंटेनन्स स्टाफची भरती!

NCRTC करतेय ऑपरेशन्स व मेंटेनन्स स्टाफची भरती! ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस झाली सुरवात

श्रीनिवास दुध्याल

नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एनसीआरटीसी) मध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे.

सोलापूर : नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (National Capital Region Transport Corporation - NCRTC) मध्ये सरकारी नोकरी (Government Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. NCRTC ने कराराच्या आधारावर 226 ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स स्टाफच्या भरतीसाठी नुकतीच 11 सप्टेंबर 2021 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार तंत्रज्ञ आणि इतर पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया बुधवार, 15 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. जे पात्र उमेदवार अर्ज करू इच्छितात, त्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता त्वरित ऑनलाइन अर्ज सादर करावा.

कुठे आणि कसे करावा अर्ज?

इच्छुक आणि पात्र उमेदवार एनसीआरटीसी भरती 2021 साठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट ncrtc.in वर दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. यासाठी वेबसाइटला भेट दिल्यानंतर उमेदवारांनी करिअर विभागात जाऊन तिथे दिलेल्या थेट लिंकद्वारे ऍप्लिकेशन पेजवर जावे. अर्जाच्या पेजवर अर्ज प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर उमेदवार संबंधित पदासाठी अर्ज सादर करू शकतील. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की अर्जाची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 (23.59 तासांपर्यंत) निश्‍चित करण्यात आली आहे.

NCRTC भरतीकरिता रिक्त पदे व भरावयाची संख्या

  • मेंटेनन्स असोसिएट (मेकॅनिकल) : 02

  • मेंटेनन्स असोसिएट (इलेक्‍ट्रिकल) : 36

  • मेंटेनन्स असोसिएट (इलेक्‍ट्रॉनिक्‍स) : 22

  • मेंटेनन्स असोसिएट (सिव्हिल) : 02

  • प्रोग्रामिंग असोसिएट : 04

  • तंत्रज्ञ (इलेक्‍ट्रिशियन) : 43

  • तंत्रज्ञ (इलेक्‍ट्रॉनिक मेकॅनिक) : 27

  • तंत्रज्ञ (एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन) : 03

  • तंत्रज्ञ (फिटर) : 18

  • तंत्रज्ञ (वेल्डर) : 02

  • ऑपरेटर/वाहतूक नियंत्रक : 67

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रीडा विश्वातील 'शू सायन्स': खेळाडूंच्या बुटांचे तळवे प्रत्येक खेळानुसार का बदलतात ? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान!

अखेर सुभेदाराच्या घरात प्रियाची एंट्री झालीच! सगळ्यांसमोर अर्जुन ठरणार खोटा, प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र वैतागले

NEET-UG पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल; १७ वर्षीय विद्यार्थ्यानं सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं

Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

SCROLL FOR NEXT