Deepak Kesarkar sakal
एज्युकेशन जॉब्स

Good News : राज्यात दोन टप्प्यात तब्बल 'इतक्या' शिक्षकांची होणार भरती; दीपक केसरकरांची मोठी घोषणा

शिक्षण विभागाकडून (Education Department) पुढील काही दिवसात ५० हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) केली जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्य शासनाने शिक्षकांच्या सर्व बदल्या रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढे, शिक्षकांनी त्यांना जी शाळा दिली आहे, तिचा सर्वांगीण विकास करणे आवश्यक आहे.

कोल्हापूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून (Education Department) पुढील काही दिवसात ५० हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३० तर दुसऱ्या टप्प्यात २० हजार शिक्षकांची पदे भरली जातील.

त्यामुळे इथून पुढे राज्यात शिक्षकांचा तुटवडा जाणवणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केसरकर म्हणाले, ‘राज्य शासनाने शिक्षकांच्या सर्व बदल्या रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढे, शिक्षकांनी त्यांना जी शाळा दिली आहे, तिचा सर्वांगीण विकास करणे आवश्यक आहे. तेथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे, त्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांना काम करावे लागणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना एकच गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अनेक शाळांनी गणवेशासाठी अगोदरच निर्णय घेतला होता. त्यामुळे एका शिष्टमंडळाने भेटून पूर्वीच्या ऑर्डर कायम करण्याची मागणी केली.

त्यानुसार एक गणवेश शालेय व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयानुसार खरेदी होईल. मात्र दुसरा गणवेश राज्यातील जिल्हा परिषद शाळेत एकच असणार आहे. दुसरा गणवेश हा स्काऊट गाईडचा असेल.’

'उध्‍दव ठाकरेंशी मतभेद झाल्यानेच उठाव झाला'

खासदार संजय राऊत यांच्यासारखेच आदित्य ठाकरे हे मर्यादा सोडून बोलत आहेत. ठाकरे हे बेलगाम बोलण्याचा उत्‍कृष्‍ट नमुना असल्याची टीका केसरकर यांनी केली. ते म्हणाले, ‘बंड झाल्यानंतर सर्व आमदार मुंबईत आले. त्यावेळी एका हॉटेलमध्ये या सर्व आमदारांची बैठक झाली. उध्‍दव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानेच हा उठाव झाला.

त्यामुळे मतभेद असले तरी त्यांच्यावर व्यक्तिगत टीका कोणीही करायची नाही, असा निर्णय आमदारांच्या या बैठकीत घेण्यात आला. मित्र पक्षांनाही अशा पध्‍दतीची सूचना केली होती. मात्र आदित्य ठाकरे हे बेलगाम, बेजबाबदारपणे बोलत आहेत. असे झाले तर आम्‍ही जी बंधने घातली आहेत, ती बाजूला होतील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT