Coast Guard Canva
एज्युकेशन जॉब्स

भारतीय तटरक्षक दलात जीडी अन्‌ मेकॅनिकल पदांची भरती!

भारतीय तटरक्षक दलात जीडी अन्‌ मेकॅनिकल पदांची भरती!

सकाळ वृत्तसेवा

नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे.

सोलापूर : इंडियन कोस्ट गार्ड (Indian Coast Guard) म्हणजेच भारतीय तटरक्षक दलाने नाविक जीडी (Sailor General Duty) आणि मेकॅनिकल (Mechanical) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोकरीच्या (Jobs) शोधात असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. कारण, भारतीय तटरक्षक दलातर्फे एकूण 322 रिक्त पदांची भरती (Recruitment) करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार 4 जानेवारी 2022 पासून अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2022 आहे.

इच्छुक उमेदवारांनी नाविक जीडी व मेकॅनिकल पदांसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या joinindiancoastguard.cdac.in वर जाऊन अर्ज सादर करावा. 14 जानेवारीच्या आत उमेदवारांनी अर्ज सादर करावा, कारण मुदतीनंतर कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अशी आहे पदांची संख्या

नाविक जनरल ड्यूटीसाठी 260 रिक्त जागा भरल्या जाणार असून, नाविक डीबीसाठी 35 जागा तसेच मेकॅनिकल मेकॅनिकलसाठी 27 जागांसाठी भरती होणार आहे.

जाणून घ्या पात्रता

  • नाविक जीडी : या पदासाठी उमेदवार इंटरमिजिएट पास असावा. इंटरमिजिएटमध्ये भौतिकशास्त्र (Physics) किंवा गणित (Mathematics) विषय असणे आवश्‍यक आहे.

  • नाविक : या पदासाठी उमेदवार हा 10वी पास आणि डिप्लोमाधारक (Diploma) असावा.

  • वयोमर्यादा : या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 22 वर्षे आहे.

निवड व परीक्षा शुल्क

स्टेज I, II, III आणि IV परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड होणार आहे. परीक्षा शुल्क सामान्य आणि ओबीसी (OBC) उमेदवारांसाठी 250 रुपये आहे. तर SC, ST उमेदवारांसाठी परीक्षा नि:शुल्क आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT