BECIL करतेय लॅब टेक्‍निशियन, फार्मासिस्टसह इतर पदांची भरती! esakal
एज्युकेशन जॉब्स

BECIL करतेय लॅब टेक्‍निशियन, फार्मासिस्टसह इतर पदांची भरती!

BECIL करतेय लॅब टेक्‍निशियन, फार्मासिस्टसह इतर पदांची भरती!

सकाळ वृत्तसेवा

Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

सोलापूर : Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. BECIL ने लॅब टेक्‍निशियन फार्मासिस्ट (Lab Technician Pharmacist), स्टोअर कीपर कम क्‍लर्क (Store Keeper Cum Clerk), गॅस स्टीवर्ड (Gas Steward), ग्रंथपाल (Librarian) आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत एकूण 80 पदांची भरती (Recruitment) केली जाणार आहे. या पदांसाठी भरतीची अधिसूचना (Notification) 9 डिसेंबर 2021 रोजी जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे आणि जे पात्र आहेत, ते @becil.com वर जाऊन अधिसूचना पाहू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2021 आहे. (Recruitment of other posts including Lab Technician, Pharmacist in BECIL)

जाणून घ्या पात्रता

Broadcast Engineering Consultants India Limited ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार स्टोअर कीपर कम लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना स्टोअर हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव व मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्‍यक आहे. तर फार्मासिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था / बोर्डातून फार्मसीमध्ये डिप्लोमा केलेला असावा. याशिवाय ग्रंथपाल ग्रेड-III च्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी सायन्स विषयात BSc पदवी असणे आवश्‍यक आहे. याशिवाय इतर पदांशी संबंधित शैक्षणिक (Education) पात्रता आणि वयोमर्यादा तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

अर्ज करताना उमेदवारांना काही तांत्रिक समस्या आल्यास ते khuswindersingh@becil.com वर लिहू शकतात. तांत्रिक व्यतिरिक्त तुम्ही भरतीशी संबंधित इतर प्रश्नांसाठी maheshchand@becil.com वर लिहू शकता. याशिवाय तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 0120-4177860 वर प्रश्न विचारू शकता.

असा असेल पगार

  • स्टोअर कीपर कम लिपिक : रु. 23,100

  • फार्मासिस्ट : रु. 26,100

  • UDC/DEO : रु. 24,800

  • मेडिकल रेकॉर्ड टेक्‍निशियन : रु. 26,100

  • गॅस स्टीवर्ड : रु. 24,800

  • लॅब टेक्‍निशियन : रु. 26,100

  • ग्रंथपाल ग्रेड-III : रु. 43,900

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT