Bank Sakal
एज्युकेशन जॉब्स

'या' बॅंकेत PO अन्‌ लिपिक पदांची भरती! 11 जानेवारीपर्यंत करा अर्ज

'या' बॅंकेत पीओ अन्‌ लिपिक पदांची भरती! 11 जानेवारीपर्यंत करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

जर तुम्ही बॅंकेत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

जर तुम्ही बॅंकेत नोकरीच्या (Jobs) शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. साउथ इंडियन बॅंक लिमिटेडने (South Indian Bank Limited - SIB) PO आणि लिपिक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या अंतर्गत स्केल संवर्ग 1 मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) आणि प्रोबेशनरी क्‍लर्क (Probationary Clerk) या पदांसाठी भरती (Recruitment) केली जाणार आहे. फ्रेशर्स आणि अनुभवी दोन्ही उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना बॅंकेच्या अधिकृत वेबसाइट southindianbank.com ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, त्यांनी त्यांचा अर्ज एका आठवड्याच्या आत म्हणजे 11 जानेवारी किंवा त्यापूर्वी सबमिट केला पाहिजे. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. (Recruitment of Probationary Officer and Clerk in South Indian Bank Limited)

बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार, पीओ फ्रेशर आणि क्‍लर्क फ्रेशर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 26 वर्षे असावे. तर PO अनुभवी आणि लिपिक अनुभवी अर्जदारांचे वय 28 वर्षे असावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल. साउथ इंडियन बॅंक लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य उमेदवारांना 800 रुपये शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवारांनी नोंद घ्यावी, की फी फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाईल.

अशी होईल निवड

बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार, पीओ फ्रेशर आणि अनुभवी लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT