Recruitment of women in Army Technical Corps will start from Women Day 8 march know application process 
एज्युकेशन जॉब्स

महिला दिनापासून सुरु होणार सैन्य दलामध्ये महिलांची भरती, अर्ज कसा करावा?

Army Recruitment 2022: महिला दिनापासून भारतीय सैन्यदलामध्ये टेक्निकल कॉर्प्समध्ये महिलांची भरती

सकाळ डिजिटल टीम

Army Recruitment 2022: भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होऊन देशाचे संरक्षण करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च २०२२ पासून भारतीय सैन्यदलामध्ये टेक्निकल कॉर्प्समध्ये पुरुषांसह महिलांची देखील भरती होणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर केले असून इच्छूक आणि पात्र महिला ऑफिशिअल भरती पोर्टल, joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज पाठवू शकता. सेन्याद्वारे एसएससी(टेक)साठी अर्जाची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२२ आहे

भारतीय सैन्य दलामध्ये भर्ती संचालनालयद्वारे एम्प्लॉयमेंट न्यूज वीक 26 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार,

शॉर्ट सर्व्हिस कमिशन (तांत्रिक) मध्ये 59 व्या अभ्यासक्रमासाठी पुरुष आणि 30 व्या अभ्यासक्रमासाठी महिलांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. आर्मी एसएससी (टेक) भर्ती 2022 अंतर्गत, ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होणाऱ्या कोर्ससाठी पुरुष आणि महिलांसाठी भरती केली जाईल.

Army Recruitment 2022: अर्ज प्रक्रिया शिका

अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यावर, joinindianarmy.nic.in या अधिकृत भर्ती पोर्टलला भेट द्या.

येथे 'ऑफिसर्स एन्ट्री अप्लाय' विभागात जाऊन अर्ज करा.

यासाठी उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत ईमेल आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून अर्ज करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT