भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड Sakal
एज्युकेशन जॉब्स

BEL मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 10 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

BEL मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 10 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

श्रीनिवास दुध्याल

अर्ज करण्यापूर्वी अर्जाचा फॉर्म पूर्णपणे वाचावा, कारण अर्जामध्ये काही तफावत आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.

सोलापूर : भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड (Bharat Electronics Limited - BEL) ने अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी (Recruitment) अर्ज मागविले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे BEL एकूण 73 पदांची भरती करणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत पोर्टल boat-srp.com ला भेट देऊन या पदासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी अर्जाचा फॉर्म पूर्णपणे वाचावा, कारण अर्जामध्ये काही तफावत आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.

या तारखा लक्षात ठेवा

  • 25 ऑक्‍टोबर 2021 रोजी शिकाऊ पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात

  • शिकाऊ पदांसाठी NATS पोर्टलवर नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2021

  • 30 नोव्हेंबर 2021 रोजी निवडलेल्या यादीची घोषणा

रिक्त जागांचा तपशील

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस : 63

  • इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि कम्युनिकेशन इंजिनिअर : 28

  • मेकॅनिकल इंजिनिअर : 25

  • इलेक्‍ट्रिकल अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर : 05

  • कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअर : 03

  • सिव्हिल इंजिनिअर : 02

  • डिप्लोमा अप्रेंटिस

  • इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड कम्युनिकेशन इंजिनिअर : 05

  • मेकॅनिकल इंजिनिअर : 05

डिप्लोमा अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तपासली पाहिजे. उमेदवार भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडने जारी केलेल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना तपासू शकतात. अर्जदारांची शॉर्टलिस्टिंग संबंधित विषयांना लागू असलेल्या मूलभूत विहित पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीद्वारे सूचित केले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना चेन्नई येथे प्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहावे लागेल. त्याच वेळी, या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अर्जदारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT