युनियन बॅंकेत होणार व्यवस्थापक पदांसाठी भरती Canva
एज्युकेशन जॉब्स

युनियन बॅंकेत व्यवस्थापक पदांसाठी भरती! 3 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

युनियन बॅंकेत होणार व्यवस्थापक पदांसाठी भरती ! 3 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

श्रीनिवास दुध्याल

युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये सरकारी नोकरी शोधू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

सोलापूर : युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये (Union Bank of India) (UBI) सरकारी नोकरी (Government job) शोधू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यूबीआयने विविध विभागांमध्ये सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager), व्यवस्थापक (Manager) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (Senior manager) या पदांसाठी विशेष अधिकारी म्हणून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बॅंकेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, एकूण 347 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार यूबीआयच्या अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in. वर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात अर्ज प्रक्रिया आज, 12 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली असून उमेदवार 3 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील.

https://ibpsonline.ibps.in/ubirscoaug21/ या लिंकवरून तपासा UBI भरती 2021 ची अधिसूचना

पोस्टनिहाय रिक्त पदांची संख्या

  • सीनिअर मॅनेजर (रिस्क) - 60 पदे

  • मॅनेजर (रिस्क) - 60 पदे

  • मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअर) - 7 पदे

  • मॅनेजर (आर्किटेक्‍ट) - 7 पदे

  • मॅनेजर (इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर) - 2 पदे

  • मॅनेजर (प्रिंटिंग टेक्‍नॉलॉजिस्ट) - 1 पद

  • मॅनेजर (फॉरेक्‍स) - 50 पदे

  • मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट) - 14 पदे

  • असिस्टंट मॅनेजर (टेक्‍निकल ऑफिसर) - 26 पदे

  • असिस्टंट मॅनेजर (फॉरेक्‍स) - 120 पदे

पात्रता...

सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर आणि MBA/PGDBM किंवा अभियांत्रिकी पदवी असणे आवश्‍यक आहे. त्याच वेळी व्यवस्थापक पदांसाठी संबंधित ट्रेड / विषय किंवा क्षेत्रात पदवी किंवा पीजी असणे आवश्‍यक आहे आणि किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्‍यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी CA, CFA, CS किंवा MBA किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्‍यक. उमेदवारांचे वय वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 30 ते 40 वर्षे, व्यवस्थापक पदासाठी 25 ते 35 वर्षे आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 20 ते 30 वर्षे असावे. पात्रतेशी संबंधित अधिक तपशिलासाठी भरती अधिसूचना पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT