NEET PG  google
एज्युकेशन जॉब्स

NEET PG : 'नीट' परीक्षेच्या नोंदणीबाबत परीक्षा मंडळाकडून महत्त्वाची सूचना प्रसिद्ध

पदव्युत्तर नीटसाठी आज दुपारी ३ वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार होती.

नमिता धुरी

मुंबई : पदव्युत्तर नीट परीक्षेसाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने नीट नोंदणीबाबत महत्त्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे.

पदव्युत्तर नीटसाठी आज दुपारी ३ वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार होती; मात्र ही प्रक्रिया आजपासून सुरू होणार नसल्याचे परीक्षा मंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. (NEET PG 2023) हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५ मार्च २०२३ रोजी नीट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आजपासून म्हणजेच ५ जानेवारीला दुपारी ३ वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार होती.

नोंदणी करण्यासाठी सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता; मात्र परीक्षा मंडळाच्या एका परिपत्रकाने या उत्साहावर पाणी पडले. आजपासून सुरू होणारी नोंदणी प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशा आशयाचे परिपत्रक परीक्षा मंडळाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात असेही नमूद करण्यात आले आहे की, नीट परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होणार असलेल्या जाहिरातींकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करावे. त्यामुळे आता परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

दरवर्षी हजारो विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असतात. या अभ्यासक्रमांच्या सरकारी व खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.

पदवी अभ्यासक्रमासाठी नीट परीक्षा अनिवार्य असते. तसेच पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानतंर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीही नीट परीक्षा अनिवार्य असते.

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची नीट परीक्षा यंदा मार्चमध्ये होणार आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया ५ जानेवारीपासून सुरू होत असल्याच्या जाहिराती काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या होत्या; मात्र आज ही प्रक्रिया सुरू होणार नसल्याचे परीक्षा मंडळाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: सामान्य डब्यांनाही एसीसारखी स्वच्छता असणार! भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ट्रेन प्रवासात ऐतिहासिक बदलाची नांदी

Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

14,50,00,000 रुपये ! अभिषेक बच्चनची लक्झरी अपार्टमेंट विकून बक्कळ कमाई ; सिनेमे अपयशी पण बिझनेसमध्ये यश

Latest Marathi News Live Update : हर्षवर्धन सपकाळांनी शिवरायांची तुलना टिपू सुलतानशी केली, आम्ही हे सहन करणार नाही - मुख्यमंत्री

Bavchi ZP Election : ‘क्रॉस वोटिंग’ राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतनीय; समन्वयाचा अभाव नडला, शिवसेनेला ताकद नसताना बावची, गोटखिंडी गणात विजय

SCROLL FOR NEXT