right to education sakal
एज्युकेशन जॉब्स

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत बुधवारी होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात काढण्यात येणार प्रवेशाची ऑनलाइन सोडत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेशाची ऑनलाइन सोडत (लॉटरी) बुधवारी (ता.३०) दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात काढण्यात येणार आहे.

आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्रवेश प्रक्रियेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता राज्यातील जवळपास ९ हजार ८८ शाळांमधील तब्बल एक लाख दोन हजार २२ जागांकरिता सुमारे दोन लाख ८२ हजार ७७६ अर्ज आले आहेत. प्रवेश प्रक्रियेमार्फत मुलांच्या प्रवेशासाठी यंदा मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. तर पुणे जिल्ह्यातील ९५७ शाळांमधील १५ हजार १३२ जागांकरिता तब्बल ६२ हजार ९५६ अर्ज आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेला १६ फेब्रुवारीपासून सुरवात झाली होती. प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरल्यानंतर आरटीई प्रवेशाच्या सोडत कधी लागणार याची प्रतीक्षा लाखो पालकांना होती, आता अखेर ही परीक्षा संपणार आहे.

‘‘शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत बुधवारी (ता.३०) जाहीर करण्यात येत आहे. यावेळी प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित राहतील.’’ अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Vastu Tips: धुळीच्या भीतीने घराच्या खिडक्या २४ तास बंद ठेवताय? वास्तूशास्त्रानुसार ओढावू शकतात 'या' ५ मोठ्या अडचणी!

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT