RTE admission registration starts from Wednesday education school student mumbai sakal
एज्युकेशन जॉब्स

RTE Admission : पालकांना खुशखबर ! बुधवारपासून आरटीई प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात

बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये असलेल्या २५ टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी

संजीव भागवत

मुंबई : बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये असलेल्या २५ टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया बुधवारी १ मार्चपासून सुरू केली जाणार आहे. यासाठीची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.

राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागा ठेवून त्यावर आरटीईचे प्रवेश केले जातात. त्यामध्ये मागास, आर्थिक दुर्बल आणि अल्पसंख्यांक समाजातील घटकांना प्रवेश दिले जातात.

या प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाकडून मागील काही दिवसात राज्यातील शाळांची नोंदणी पूर्ण केली आहे. त्या नोंदणीनुसार यंदा राज्यात ८ हजार १३० शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून या शाळांमध्ये तब्बल एक लाखाहून अधिक आरटीई च्या जागा उपलब्ध आहेत.

या जागांवर प्रवेश करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनांकडून बुधवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेची जिल्हा व शाळा निहाय माहिती संचालनालयाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex/language:jpn या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT