RTE admissions sakal
एज्युकेशन जॉब्स

राज्यातील खासगी शाळांमध्ये आरटीईच्या प्रवेशांना २९ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश घेणाऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सम्राट कदम

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश घेणाऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे - शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) प्रवेश (Admission) घेणाऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना (Students) २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील खासगी शाळांमध्ये (Private School) राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया सोडत (लॉटरी) (Draw) पद्धतीने राबविण्यात येत आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे पालकांना कागदपत्रे जमा करण्यासाठी अवधी मिळाला आहे. तसेच, कागदपत्रे पडताळणी समितीच्या सदस्यांनी पालकांना योग्य मार्गदर्शन केल्यास प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३साठी ३० मार्च रोजी सोडत जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर निवड आणि प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली आहे. सुरवातीला २० एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पालकांसह लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी दिली आहे. निवड आणि प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईल संदेशाद्वारे माहिती दिल्याचेही टेमकर यांनी सांगितले आहे.

निवासी पुराव्यासाठी भाडेकरार...

२०२२-२३ च्या प्रवेशासाठी निवासी पुरावा म्हणून अकरा महिन्यांचा नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरावा, अशी मागणी पालकांच्या वतीने करण्यात आली होती. त्याची दखल घेत आरटीई प्रवेशासाठी ११ महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरण्यात येणार आहे.

आरटीईची आकडेमोड -

  • निवड यादीतील विद्यार्थी - ९०,६८८

  • प्रतिक्षा यादीतील विद्यार्थी - ६९,८५९

  • दिव्यांग विद्यार्थी - २००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला भारताकडून कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

SCROLL FOR NEXT