exam esakal
एज्युकेशन जॉब्स

Exam : दोन परीक्षांमुळे ‘सारथी’चे विद्यार्थी अडचणीत

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी घेण्यात येणारी सामाईक पात्रता परीक्षेचे अनेक विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी घेण्यात येणारी सामाईक पात्रता परीक्षेचे अनेक विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. ही परीक्षा रविवारी (ता. १७) होणार असून त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ‘क’ ची परीक्षा आहे. त्यामुळे ‘सारथी’ची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने संशोधक विद्यार्थ्यांना दरवर्षी अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते. त्यासाठी या पूर्वी विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन गुणवत्तेच्या आधारे छात्रवृत्ती प्रदान करण्यात येत होती. परंतु, राज्य सरकारने छात्रवृत्तीच्या संख्येवर मर्यादा आणली. त्यामुळे आता २०० विद्यार्थ्यांनाच ही छात्रवृत्ती देण्यात येणार आहे.

त्यासाठी ‘सारथी’ने ही परीक्षा रविवारी (ता. १७) जाहीर केली आहे. परंतु, त्याच दिवशी राज्य लोकसेवा आयोगाचीही परीक्षा आली आहे. त्यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांतून अनेक उमेदवार तयारी करीत आहेत. परंतु, दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला आहे.

सीईटी परीक्षेबद्दल बोलताना उमेदवार निखिल मगर म्हणाले, ‘‘सारथीच्या वतीने आजवर मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येत होती. आता ऐन वेळी गुरुवारी (ता.७) कळविण्यात आले की १७ डिसेंबरला सीईटी परीक्षा होणार आहे. तसेच त्याच दिवशी एमपीएससीची परीक्षा असल्यामुळे उमेदवार संभ्रमात आहे.

पीएच.डी. ला प्रवेश मिळावा म्हणून आम्ही पेट, नेट आणि सेट सारख्या परीक्षा देतो. मंग या परीक्षेचा फार्स का?’’ विधिमंडळात यासंबंधी आमदारांचीही भेट घेतली असून, तेही या बाबतचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT