Sarthi Sanstha Sakal
एज्युकेशन जॉब्स

Sarthi Exam : सारथीची पात्रता परीक्षा अखेर पुढे ढकलली

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने संशोधन शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने संशोधन शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानूसार १७ ऐवजी २४ डिसेंबरला सारथी, बार्टी व महाज्योती पीएचडी फेलोशीप संयुक्त सीईटी परीक्षा पार पडणार आहे.

राज्यभरातील मराठा किंवा कुणबी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते. पात्र विद्यार्थ्यांची निवड मागील वर्षापर्यंत मुलाखत घेऊन गुणवत्तेच्या आधारे प्रदान करण्यात येत होती. परंतु, राज्य सरकारने छात्रवृत्तीच्या संख्येवर मर्यादा आणली. त्यामुळे आता सामाईक परीक्षेचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

रविवारी (ता.१७) एकाच दिवशी सारथीच्या पात्रता परीक्षेबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ‘क’ची देखील परीक्षा होती. त्यामुळे ही पात्रता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. यासंबंधीचे वृत्तही ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. अखेर परीक्षा पुढे ढकलल्याचे परीपत्रक सारथीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाला यासंबंधीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

परीपत्रकात सारथी म्हणते, ‘‘राज्यातील पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ डिसेंबरला एमपीएससी बरोबरच इतरही परीक्षा असल्याने परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी विद्यार्थी करत आहे. त्यामुळे संयुक्त पात्रता परीक्षा १७ ऐवजी २४ डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात यावी.’’ लवकरच विद्यार्थ्यांना यासंबंधीचे परीक्षा प्रवेश पत्रही पाठविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT