CET-Exam 
एज्युकेशन जॉब्स

संधी हुकलेल्‍यांसाठी शनिवारी, रविवारी एमएचटी-सीईटी परीक्षा

नियमित परीक्षेला ८४.४ टक्‍के विद्यार्थ्यांची उपस्‍थिती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि बी. एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी नुकतीच झाली. नियमित सत्रातील या परीक्षेत पीसीएम आणि पीसीबी ग्रुपकरिता एकूण ३२ हजार ५५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी २७ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. हे प्रमाण ८४.४ टक्‍के राहिले, तर पाच हजार ७२ विद्यार्थी गैरहजर होते. दरम्‍यान, विविध कारणांनी परीक्षेपासून मुकलेल्‍या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (ता. ९) व रविवारी (ता. १०) विशेष सत्रातून परीक्षा घेतली जाणार आहे.

सीईटी सेलतर्फे विशेष सत्र परीक्षेसाठीचे सूचनापत्र जारी केले आहे. त्‍यानुसार एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करूनही परीक्षेस बसू शकले नाहीत किंवा तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा पूर्ण करू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांना नि:शुल्क नोंदणीसाठी रविवार (ता. ३)पर्यंत मुदत होती. उमेदवारांना परीक्षा केंद्राच्‍या उपलब्‍धतेनुसार परीक्षा केंद्र आणि नव्‍याने प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जाणार आहे. येत्‍या शनिवारी व रविवारी पीसीएम व पीसीबी या दोन्‍ही ग्रुपची परीक्षा विशेष सत्रांतून होणार आहे.

तर मिळणार अतिरिक्‍त संधी

विविध पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा सोमवार (ता. ४) ते शुक्रवार (ता. ८) यादरम्‍यान होणार आहे. या परीक्षेदरम्‍यान अतिवृष्टीमुळे अडचणी निर्माण झाल्‍यास अशा विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्‍हा घेतली जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची अतिरिक्‍त संधी उपलब्‍ध केली जाईल. या संदर्भातील सूचना व वेळापत्रक नव्‍याने प्रसिद्ध केले जाणार आहे, असे सीईटी सेलने कळविले आहे.

जिल्ह्यातील उपस्‍थितीचा तपशील

पीसीएम ग्रुपचे विद्यार्थी

  • प्रविष्ट १६ हजार ७८८

  • उपस्‍थित १४ हजार ६६०

  • गैरहजर दोन हजार १२८

पीसीबी ग्रुप

  • प्रविष्ट १५ हजार ७७०

  • उपस्‍थित १२ हजार ८२६

  • गैरहजर दोन हजार ९४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Snake Discovery: डोळे नसलेल्या सापावर संशोधन; पुण्यातील ‘तस्कर’ सापाची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद, डोळ्यांच्या जागी गुळगुळीत खवले!

Pune News: प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! तिकिटावरील मर्यादा रद्द; विमान कंपन्यांनी दर वाढवले, काय आहेत कारणे?

Chhatrapati Sambhajinagar: चार किमी आले, उरले ३५ किलोमीटर!; दुसरा टप्पा सुरू; नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत कधी येणार?

Chhatrapati Sambhajinagar: थकबाकीमुळे ८१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Chhatrapati Sambhajinagar: आठवडाभरात मिळणार शिधापत्रिकेवर केरोसीन; कंपन्यांकडून तालुकानिहाय होणार वाटप

SCROLL FOR NEXT