Career-Opportunity
Career-Opportunity 
एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या... : सामाजिक क्षेत्रात जायचंय?

सकाळ वृत्तसेवा

समाजकार्य म्हणजे व्यक्ती, गट किंवा समुदायाच्या गरजांच्या पूर्तीसाठी सर्व प्रकारच्या साधनांचा एकत्रित वापर करून लोकांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी सक्षम करणे होय.

- सविता भोळे

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस

समाजकार्य म्हणजे व्यक्ती, गट किंवा समुदायाच्या गरजांच्या पूर्तीसाठी सर्व प्रकारच्या साधनांचा एकत्रित वापर करून लोकांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी सक्षम करणे होय. म्हणूनच समाज कार्य ही एक संघटित व्यावसायिक सेवा आहे. त्याकरिता प्रशिक्षित स्वयंसेवक तयार केले जातात. यासाठी विविध शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अर्थात टी.आय.एस.एस. (TISS), ही समाजकार्याचे व्यावसायिक शिक्षण देणारी आशियातील पहिली संस्था आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि भारत सरकारतर्फे अनुदानप्राप्त असे हे स्वायत्त विद्यापीठ, १९३६मध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टने स्थापन केले.

अत्यंत व्यासंगी अध्यापक वर्ग, अभिनव अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांमधील क्षमतांना पुरेपूर संधी देणारे वातावरण, समृद्ध फिल्ड अनुभव, विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील समानतेचे नाते, नेतृत्व क्षमतेला वाव देणारे विविध उपक्रम, देशभरातील तसेच परदेशातील विद्यार्थ्यांमुळे भिन्न भाषिक तसेच सांस्कृतिक वातावरणाची ओळख होण्याची संधी या सर्व गोष्टींमुळे येथे अ‍ॅडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडून येत या संस्थेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट मिळते. ITC, Amazon, RIL, IBM, Dell, HUL, Colgate, Flipkart अशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळते, तसेच रिमांड होम, शिक्षण विकास, आदिवासी विकास निर्मूलन यासारख्या प्रशासकीय प्रकल्प आणि खासगी एनजीओमध्येही चांगल्या संधी उपलब्ध असतात.

‘टीआयएसएस’चे मुंबई हे मुख्य केंद्र आहे, तर तुळजापूर, हैदराबाद आणि गुवाहाटी येथे ही केंद्रे आहेत. या चार केंद्रांमध्ये १७ विद्या शाखांच्या माध्यमातून पदव्युत्तर, पीएचडी, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस चालविले जातात.

‘टीआयएसएस’तर्फे चालविले जाणारे कोर्सेस...

पदव्युत्तर कोर्सेस...

  • सोशल वर्क

  • डेव्हलपमेंट स्टडीज

  • वूमन स्टडीज

  • पॉलिसी अँड गव्हर्नन्स

  • हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन

  • पब्लिक हेल्थ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन

  • पब्लिक हेल्थ पॉलिसी इकॉनॉमिक्स अँड फायनान्स

  • पब्लिक हेल्थ सोशल एपिडेमिओलॉजी

  • ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड लेबर रिलेशन्स (HRM-LA)

  • ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट चेंज अँड लीडरशिप (ODCL)

  • सोशल आंत्रप्रेन्युअरशिप

  • डिझास्टर मॅनेजमेंट

  • हॅबिटॅट पोलिसी अँड प्रॅक्टिस

  • मीडिया अँड कल्चरल स्टडीज

  • डिसेबिलिटी स्टडीज अँड ॲक्शन

यांसारखे एकूण पन्नासहून अधिक कोर्सेस येथे उपलब्ध आहेत. उच्चदर्जाचे व्यवसायिक प्रशिक्षण देणाऱ्या या सर्व कोर्सेसची रचना सध्याच्या सामाजिक परिस्थितीशी सुसंगत आहे.

सर्व कोर्सेससाठी...

  • कालावधी : दोन वर्षे

  • पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विद्याशाखेची पदवी.

  • विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते. यावर्षी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (TISSNET-2022) १२ फेब्रुवारी २०२२ रोजी होईल. या परीक्षेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन १७ डिसेंबरपासून सुरू आहे व ते ६ फेब्रुवारीपर्यंत करता येईल.

प्रवेश परीक्षा स्वरूप...

पहिली पायरी...

  • TISS NET - सर्व M A कोर्सेससाठी - 100मिनिट - 100प्रश्न - 100गुण

  • कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे. या परीक्षेचा रिझल्ट लागून फायनल यादी जाहीर झाल्यानंतर संस्थेतर्फे आणखी एक परीक्षा घेतली जाते.

दुसरी पायरी...

  • TISS MAT ही परीक्षा फक्त MA(HRM&LR) आणि MA(ODCL) या दोन अभ्यासक्रमांसाठी घेतली जाते.

  • TISS PAT ही परीक्षा बाकी सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी घेतली जाते.

या दोन्ही परीक्षा 50 गुणांकरिता असून यासाठी 45 मिनिटांचा वेळ असतो.

तिसरी पायरी...

पर्सनल इंटरव्ह्यू : प्रत्येक विद्यार्थ्याचा ऑनलाइन इंटरव्ह्यू घेऊन मग अंतिम निवड केली जाते. अधिक माहितीसाठी विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

संकेतस्थळ : https://www.tiss.edu

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT