Sakal
एज्युकेशन जॉब्स

सेट परिक्षार्थींसाठी मोफत ऑनलाईन कार्यशाळा

- मीनाक्षी गुरव

सेट परिक्षा देणाऱ्या विद्यार्थासाठी मोफत ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

पुणे: महाराष्ट्र व गोवा राज्यात होणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सेट परिक्षा देणाऱ्या विद्यार्थासाठी मोफत ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने, राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी यंदा २६ सप्टेंबर २०२१ रोजी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा होणार आहे. उमेदवारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून ३ ते ५ ऑगस्टदरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ४ या वेळेत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेत सामान्य ज्ञान या विषयातील अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, निकाल, अभ्यासक्रम, आरक्षण, अर्जामधील बदल, गुणवत्ता यादी इत्यादींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर करणार आहेत. ही कार्यशाळा https://www.facebook.com/ecdlic या लिंकवर live प्रक्षेपण करण्यात येईल. परीक्षेत येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे तसेच परीक्षेच्या निकालमध्ये वाढ होण्यासाठी विद्यापीठाने व्यापक हित लक्षात घेत या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT