एज्युकेशन जॉब्स

महत्वाची बातमी - शिष्यवृत्तीचे वेळापत्रक पुन्हा बदलले

१२ ला परिक्षा; काही ठिकाणच्या अतिवृष्टीमुळे निर्णय

सकाळ डिजिटल टीम

ओरोस : शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत तिसऱ्या वेळी बदल करण्यात आला आहे. ८ ऑगस्टला होणारी ही परीक्षा ९ ऑगस्टला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ही परीक्षा १२ ऑगस्टला होणार आहे. कोरोना (covid-19) प्रादुर्भावमुळे २०२०-२१ च्या अनिश्चित काळासाठी स्थगित झालेल्या पूर्व व उच्च प्राथमिक माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (scholarship exam) ८ ऑगस्टला होणार होत्या; मात्र त्यानंतर ही परीक्षा ९ ऑगस्टला होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली होती.

शासनाने पुन्हा नव्याने आदेश काढत ही परीक्षा १२ ऑगस्टला होणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी सुरू (heavy rain) असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सबंधित शाळांच्या लॉगिंगला २७ जुलैला उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीच्या परीक्षा फेब्रुवारी २०२१ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेतल्या जातात.

यावर्षी या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते; परंतु कोरोना प्रादुर्भावमुळे ही परीक्षा होवू शकली नव्हती. त्यामुळे शासनाने ३० मार्चला पत्र काढत ही परीक्षा २३ मे घेण्यास मान्यता दिली होती; परंतु पुन्हा कोरोनामुळे ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा ८ ऑगस्टला कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यास शासनाने मान्यता दिली होती. तसे पत्र राज्य शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांचे प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यानंतर ९ ऑगस्टला होणार होती. आता ही परीक्षा १२ ऑगस्टला होणार आहे; मात्र आता ही परीक्षा शासनाने एक दिवस पुढे ढकलली असल्याचे आंबोकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Local: लोकलसंदर्भात मोठी अपडेट! पुणे स्टेशनवरुन लोकल ट्रेन सुटणार नाहीत

MS Dhoni: यंदा न खेळताच धोनीची ‘आयपीएल’मधून निवृत्ती? अखेरच्या मोसमाची शक्यता

Bidkin Crime DMIC: बिडकीन DMIC परिसरात दोन तरुणांचे मृतदेह; विषारी औषधाची बाटली आढळल्याने संशय, तपास सुरू..

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिलेचा मृत्यू

IPL 2026, Purple Cap: भुवनेश्वर कुमारने बुमराहच्या पंक्तीत स्थानही मिळवलं अन् पर्पल कॅपही डोक्यावर चढवली; शर्यतीत टॉप-५ कोण?

SCROLL FOR NEXT