education google
एज्युकेशन जॉब्स

परदेशी शिक्षणाचा विचार करताय ? या शिष्यवृत्ती देतील आर्थिक आधार

परदेशातील शिक्षण सुकर होण्यासाठी विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. यासाठी काही परीक्षा घेतल्या जातात व गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते.

नमिता धुरी

मुंबई : जागतिक पातळीवरील शिक्षण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरते. म्हणूनच दरवर्षी लाखो विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. यामुळे त्यांना नव्या संधींची कवाडे खुली होतात.

परदेशातील शिक्षण सुकर होण्यासाठी विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. यासाठी काही परीक्षा घेतल्या जातात व गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते. या कोणत्या शिष्यवृत्त्या आहेत जाणून घेऊ या....

इरॅस्मस मुंडस जॉइंट मास्टर डिग्री

युरोप आणि इतर देश यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी युरोपियन युनियनद्वारे राबवला जाणारा हा आंतरराष्ट्रीय अध्ययन कार्यक्रम आहे. महाविद्यालयामधून जॉइंट मास्टर डिग्री मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. ही युरोपात दिली जाणारी सर्वात मोठी शिष्यवृत्ती असून यात मासिक भत्ता, प्रवासखर्च व इतर सुविधांचा समावेश असतो.

ओंटारियो ट्रिलियम

ही शिष्यवृत्ती दरवर्षी ७ जणांना दिली जाते ज्यांनी आपली पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे व शेवटच्या दोन सत्रांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. कॅनडाच्या ओंटारियोमध्ये डॉक्टरेट करू इच्छिणाऱ्यांसाठी ही शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये यासाठी अर्ज उपलब्ध होतात.

वानियर कॅनडा ग्रॅज्युएट

कॅनडाई संस्थेतून निसर्ग विज्ञान, समाजविज्ञान, आरोग्य, अभियांत्रिकी या विषयांमध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत अर्ज उपलब्ध होतात.

ऑक्सफर्ड अॅण्ड केंब्रिज सोसायटी ऑफ इंडिया

सर्व शैक्षणिक स्तरांतील विद्यार्थी अर्ज करू शकतात. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा हेतू आहे. यासाठी अर्जदाराचे वय ३० वर्षे असावे व मेमध्ये अर्ज करता येईल.

टाटा स्कॉलरशिप कॉर्नेल यूनिवर्सिटी

कॉर्नेल विद्यापीठात शिकू इच्छिणाऱ्यांना अभ्यासक्रमाच्या कालावधीत वार्षिक स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अर्ज करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT