एज्युकेशन जॉब्स

विद्यार्थ्यांनो, तयार रहा! शाळा, महाविद्यालये लवकरच सुरू होणार

उद्या दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता

मिलिंद देसाई

बेळगाव : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक टाळण्यासाठी 23 ऑगस्टपासून शाळा महाविद्यालये सुरू (school and college start) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (belgaun news) त्यानुसार पहिल्या टप्प्यात दहावी व बारावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिलेला दहावीचा निकाल 7 ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. (10 th result)

गेल्या काही दिवसांपासून शिक्षण खात्याने शाळा लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र कोरोनाच्या (covid-19) संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे दोन आठवडे शाळा सुरू करू नयेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय पंधरा दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी पहिल्या टप्प्यात दहावी व बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अनेक दिवसानंतर शाळा महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी शाळा व महाविद्यालये कशा प्रकारे सुरू केले जाईल. त्याची नियमावली काय असेल याबाबतची स्पष्ट माहिती अजून देण्यात आलेली नाही. अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी दिली असून अधिकृत माहिती येताच सर्व शाळांना याबाबत कळविण्यात येईल अशी माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी शिक्षण खात्याने केली आहे. शनिवारी निकाल जाहिर होण्याची शक्यता असून यावेळी ओएमआरआर शीटद्वारे परीक्षा घेण्यात आल्याने निकाल लवकर जाहीर करण्यास मदत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: IMDचा मोठा इशारा! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; पुढील २ दिवस कसे असेल हवामान?

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन कधी आहे? राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या मुहूर्त आणि संपूर्ण माहिती

Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू; बालकासह आणखी तिघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Latest Marathi News Live Update : अंबाबाई मंदिर संवर्धनातील त्रुटींबाबत म्हणणे मांडा; पुरातत्त्‍व विभागाला कारणे दाखवा नोटीस

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले! मोसमातील पहिलाच विसर्ग; धरणात 86.11 टीएमसी साठा, 25 हजार क्युसेकने पाण्याची आवक

SCROLL FOR NEXT