pune university
pune university Sakal
एज्युकेशन जॉब्स

पुणे विद्यापीठात स्टार्टअपसाठी सीड फंड मिळणार..!

सकाळ वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशनला स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत पाच कोटी रुपयांचे बीज भांडवल (म्हणजेच सीड फंड) मिळाला.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशनला स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत पाच कोटी रुपयांचे बीज भांडवल (म्हणजेच सीड फंड) मिळाला आहे. याअंतर्गत निवडक स्टार्टअप्स्‌ना सीड फंड उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन ही स्टार्टअप विषयात काम करणारी सेक्शन ८ कंपनी असून या माध्यमातून स्टार्टअप्स्‌ना मार्गदर्शन करणे, नवउद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन करणे, स्टार्टअप्स्‌ना निधी उपलब्ध करुन देणे, यावर काम करण्यात येते. केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया कार्यक्रमांतर्गत ‘सीड फंड स्कीम’द्वारे फाऊंडेशनला हा निधी प्राप्त झाला आहे. या सीड फंडसाठी कोणतीही नोंदणीकृत कंपनी, गट किंवा स्वतंत्र व्यक्ती अर्ज करू शकते. यासाठी पात्रतेच्या अटी ‘https://seedfund.startupindia.gov.in/’ या लिंकवर जाहीर केल्या आहेत. संकल्पना, उत्पादन विकास, उत्पादन चाचण्या, बाजार प्रवेश आणि व्यापारीकरण या टप्प्यातील स्टार्टअप्स्‌ना यासाठी अर्ज करता येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली.

डॉ. पालकर म्हणाल्या, ‘विद्यापीठाकडे आलेल्या अर्जांची छाननी तज्ञांच्या समितीमार्फत केली जाईल. अर्जदारांना ४५ दिवसांत निकाल कळविला जाईल. निधीच्या २० टक्के रक्कम ही सुरुवातीच्या टप्प्यावर असणाऱ्या स्टार्टअपसाठी देण्यात येईल. केंद्र सरकारच्या प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटरनल ट्रेड विभागांतर्गत नोंदणीकृत असणाऱ्याच स्टार्टअप्स्‌ना या फंडासाठी अर्ज करता येणार आहे. दोन वर्षापेक्षा जुन्या असलेल्या कंपन्यांना यासाठी अर्ज करता येणार नाही.’

विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र व रिसर्च पार्क फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांना स्टार्टअप विषयक मार्गदर्शन केले जाते. या सीड फंडच्या निमित्ताने अनेक स्टार्टअप्स्‌ना नवकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास मदत होईल, असे डॉ. पालकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT