लेफ्टनंट पदासाठी देशातून सोलापूरच्या चैतन्य दिवाणजीची एकमेव निवड! Canva
एज्युकेशन जॉब्स

सोलापूरचा चैतन्य देशात चमकला! लेफ्टनंट पदासाठी एकमेव निवड

लेफ्टनंट पदासाठी देशातून सोलापूरच्या चैतन्य दिवाणजीची एकमेव निवड!

सकाळ वृत्तसेवा

एसएसबीच्या वतीने देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सोलापूर येथील अभियंता चैतन्य अनंत दिवाणजी या युवकाची निवड झाली आहे.

सोलापूर : सर्व्हिसेस सिलेक्‍शन बोर्ड (Services Selection Board - SSB)च्या वतीने देशपातळीवर लष्करातील (Army) लेफ्टनंट (Lieutenant) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सोलापूर (Solapur) येथील अभियंता चैतन्य अनंत दिवाणजी (Chaitanya Diwanji) या युवकाची निवड झाली आहे. या पदासाठी निवड झालेला चैतन्य देशातील एकमेव युवक आहे.

चैतन्य दिवाणजी याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अक्कलकोटच्या आयएमएसमध्ये, संगमेश्‍वर महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी पदवी पुणे येथील एम.आय.टी.मधून घेतली. चैतन्यच्या डोळ्यासमोर सुरवातीपासूनच भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न होते. त्याने अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात लष्कराद्वारे सर्व्हिसेस सिलेक्‍शन बोर्डाच्या टेक्‍निकल ग्रॅज्युएटसाठी असलेल्या सैन्य दलातील लेफ्टनंट परीक्षा प्रक्रियेत सहभाग घेतला. सर्व्हिसेस सिलेक्‍शन बोर्डाच्या (एसएसबी) देशपातळीवर लेफ्टनंट पदासाठी परीक्षा प्रक्रिया घेतली जाते.

चैतन्यचे पदवी परीक्षेचे गुण चांगले असल्याने तो मुलाखत प्रक्रियेत निवडला गेला. अगदी दोन्ही मुलाखतींचे टप्पे त्याने पार केले. तसेच शारीरिक चाचण्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. वैद्यकीय तपासणीतही त्याने उच्चस्तरीय चाचण्यांचे आव्हान पेलले. इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून लेफ्टनंट पदाच्या डेहराडून येथे भारतीय सैन्य अकादमीत होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवडला गेलेला तो देशातील एकमेव तरुण आहे. यासाठी आई-वडील व मेजर मोहित शर्मा यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले. सर्व्हिसेस सिलेक्‍शन बोर्डाद्वारे लष्करात भरती होणारा चैतन्य हा यावेळचा भारतातील एकमेव तरुण असून येथील एसबीआय बॅंकेचे उपव्यवस्थापक अनंत दिवाणजी यांचा तो सुपुत्र आहे.

आपल्या मुलाच्या यशाबाबत बोलताना अनंत दिवाणजी म्हणाले, सर्व्हिसेस सिलेक्‍शन बोर्ड (एसएसबी)च्या वतीने देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेण्यात आलेल्या जुलै 2021 परीक्षेत चैतन्यची निवड झाली, ही आमच्यासाठी खूप सुखावह आहे. चैतन्यला लहानपासूनच आर्मीचं आकर्षण होतं. आर्मीमध्ये करिअर करण्याचं, देशसेवा करण्याचं ध्येय होतं. त्यासाठी त्याने खूप तयारी केली. आम्ही मॉरल सपोर्ट दिला. मात्र यशाचं श्रेय त्याला स्वत:लाच जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Trade Deal: मोठी आर्थिक घडामोड! व्हिस्की, लक्झरी कारसह अनेक वस्तू होणार; ग्राहकांना दिलासा मिळणार, पण कधीपासून?

IND vs ENG Women Test : भारताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; ५ नव्या चेहऱ्यांना संधी

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

SCROLL FOR NEXT