Civil Defence Volunteer sakal
एज्युकेशन जॉब्स

Civil Defence Volunteer Jobs: ऐन युद्धात देशसेवा करायचीय? मग सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियरसाठी लगेच अर्ज करा! मिळेस इतकं मानधन

How To Apply For Civil Defence Volunteer in Bihar: देशसेवेची संधी! आपत्ती काळात सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर बना आणि दररोज ₹७५० मानधन मिळवा.

Anushka Tapshalkar

Emergency Response Jobs During India Pakistan Tension: भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने आपत्ती काळात मदतीसाठी सज्ज राहण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर म्हणजेच नागरिक सुरक्षा स्वयंसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे तरुण-तरुणींना या सेवेत सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी दररोज 750 रुपयांचे मानधनही मिळणार आहे.

राज्यात कुठलीही आपत्तीजन्य परिस्थिती आली, तर त्याला योग्य वेळी तोंड देता यावे यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. गावांपासून शहरांपर्यंत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मॉक ड्रिल्स घेण्यात येणार आहेत. या सगळ्या उपक्रमात सिव्हिल डिफेन्सचे स्वयंसेवक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत त्यामुळेच सरकारने अधिक व्हॉलंटियर घ्यायचा निर्णय घेतला आहे. देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या तरुण तरुणींसाठी ही एक उत्तम संधी आहे.

कोणते जिल्हे समाविष्ट आहेत?

विकास आयुक्त व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी सांगितले की, सिव्हिल डिफेन्सचे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. भारत-नेपाळ सीमेवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये, जसे की पूर्व व पश्चिम चंपारण, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अररिया आणि किशनगंज. तसेच पटणा, पूर्णिया, कटिहार, बेगूसराय आणि गया येथे अधिक स्वयंसेवकांची गरज आहे.

व्हॉलंटियर काय काम करतात?

या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते आपत्ती काळात जिल्हा प्रशासनासोबत काम करतील. गरजूंना मदत पोहोचवणे, बचाव कार्यात सहभागी होणे आणि सामान्य नागरिकांमध्ये योग्य माहिती व जागरूकता निर्माण करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल.

मानधनात वाढ

पूर्वी व्हॉलंटियरना दररोज 400 रुपये दिले जात होते. आता ते वाढवून 750 रुपये करण्यात आले आहे, म्हणजेच आता अधिक मेहनतीचे योग्य मोबदले मिळणार आहेत.

कसे व्हाल सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर?

जर तुम्हाला या सेवेत काम करायचे असेल, तर तुमच्या भागातील नागरिक सुरक्षा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, एसडीओ किंवा बीडीओ यांच्याशी संपर्क साधा. 18 वर्षांवरील इच्छुक तरुण अर्ज करू शकतात. ‘आपदा मित्र’, एनएसएस, एनसीसी, नेहरू युवा केंद्र, स्काउट व गाईड यांच्याशी जोडलेले तरुणही यात सहभागी होऊ शकतात. त्यांना प्रशिक्षण देऊन कामावर लावले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : आधी झोपेच्या गोळ्या अन् मग विजेचा करंट; पत्नीने प्रियकरासाठी पतीला हालहाल करुन मारले

Asia Junior Badminton: आशिया ज्युनियर मिश्र सांघिक स्पर्धा, अमिराती संघावर सहज मात, भारतीय बॅडमिंटन संघ उपांत्य फेरीत दाखल

Dr. Jayant Narlikar: वडिलांचे स्वप्न साकारणार; डॉ. लीलावती नारळीकर यांची भावना

पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत होते प्रेमसंबंध? त्रासाला कंटाळून तरुणानं गळफास घेऊन संपवलं जीवन; व्हिडिओ कॉल करुन काय बोलला?

Konkan Villages MSRDC : कोकणातील गावांचे गावपण जाणार, ५९३ गावांसाठी ‘एमएसआरडीसी’चे प्राधिकरण; एकनाथ शिंदेंवर ठाकरे सेना भडकली

SCROLL FOR NEXT