Shivaji University esakal
एज्युकेशन जॉब्स

Shivaji University : पेपरफुटी प्रकरणात विद्यापीठाकडून गंभीर दखल; अहवाल, सीसीटीव्ही फुटेज मागविले

ॲडव्हान्स अकाउंटन्सी विषयाचा पेपर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर परीक्षा मंडळाने तातडीने प्रश्‍नपत्रिका बदलून परीक्षा घेतली.

सकाळ डिजिटल टीम

या पेपर फुटीच्या प्रकरणाची चौकशी परीक्षा प्रमाद समिती करणार आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University Kolhapur) उन्हाळी सत्रातील पदवी परीक्षेत बी. कॉम. (B.com Exam) अभ्यासक्रमातील ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर क्रमांक चार फुटल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या निदर्शनास आले. या प्रकरणाची विद्यापीठाकडून चौकशीची प्रक्रिया सुरू झाली.

या अंतर्गत परीक्षा मंडळाने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून अहवाल आणि एसआरपीडी कक्षातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. या पेपर फुटीच्या प्रकरणाची चौकशी परीक्षा प्रमाद समिती करणार आहे.

ॲडव्हान्स अकाउंटन्सी विषयाचा पेपर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर परीक्षा मंडळाने तातडीने प्रश्‍नपत्रिका बदलून परीक्षा घेतली. या पेपरफुटी झाल्याचा संशय ज्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आहे, तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि त्याबाबतचा अहवाल लवकर सादर करण्याची सूचना संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना केली आहे.

त्यांच्याकडून अहवाल आणि फुटेज प्राप्त झाल्यावर ते पाहून त्यावरील परीक्षा मंडळाची निरीक्षणे नोंदवून अहवाल परीक्षा प्रमाद समितीकडे पाठविण्यात येईल. त्याबाबतची कार्यवाही दोन दिवसांत पूर्ण केली जाईल. त्यानंतर परीक्षा प्रमाद समितीकडून सविस्तरपणे चौकशी करण्यात येईल, असे परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले.

‘कॉपी’ करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना पकडले

बी. एस्सी., कॉम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, फूड टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट अशा विविध २१ पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा गुरुवारी झाल्या. त्यासाठी १२ हजार ३०४ विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेच्या कालावधीत भरारी पथकाने १० विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सात आणि सातारा जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT