Coding 
एज्युकेशन जॉब्स

डिकोडिंग कोडिंग... : कोडिंग आणि स्क्रीन टाइम

श्वेता दांडेकर

आजच्या पालकांसमोर सर्वांत मोठे आव्हान आहे मुलांनी स्क्रीनवर किती वेळ घालवला. कोरोनाकाळात मुले ऑनलाइन शाळेसाठी संगणकावर तासन तास घालवत असल्यामुळे ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. मग संगणकावर बसून कोडिंग शिकणे मुलांसाठी योग्य आहे का?

अग्रगण्य बालरोगतज्ज्ञ आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मायकेल रिच म्हणतात, ‘ज्या जगात आपण स्क्रीनने वेढलेले आहोत तिथे ‘स्क्रीन टाइम’ ही अप्रचलित संकल्पना बनली आहे. मुले स्क्रीनवर काय करतात, कुठले विषय पाहतात आणि शिकतात हे महत्त्वाचे आहे. याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.’

मुले (आणि प्रौढ!) यापुढे स्क्रीनपासून दूर राहू शकतात असे कोणतेही मार्ग नाहीत. ते स्क्रीनवर कसा वेळ घालवत आहेत, हे महत्त्वाचे. ते काही नवीन शिकत आहेत का? किंवा बाहेर खेळणे किंवा प्रियजनांशी बोलण्यासारखे काहीतरी अधिक उत्पादक करण्याऐवजी ते व्यंगचित्र किंवा चित्रपट पाहात आहेत? कोडिंगसारखे काहीतरी नवीन शिकणे  ‘चांगला स्क्रीन टाइम’ मानला जाऊ शकतो. तथापि, काहीतरी अधिक उत्पादनक्षम करण्याऐवजी ते निष्क्रीयपणे काहीतरी पाहात असल्यास त्याला ‘खराब स्क्रीन टाइम’ म्हणावे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्ल्ड  हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेल्या स्क्रीन टाइम मार्गदर्शक सूचनांनुसार, समोर एखादी व्यक्ती असल्यास मुलांसाठी स्क्रीन टाइम चांगला आहे. आज बरेच कोडिंग कोर्सेस शिक्षकांसमवेत घेतले जातात. महत्त्वाचे म्हणजे, मुलांनी दिवसभर स्क्रीनपासून विश्रांती घ्यावी - मग ते ऑनलाइन शालेय शिक्षण असो, कोडिंग असो किंवा रविवारी चित्रपट पाहणे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT