Small Business Idea
Small Business Idea esakal
एज्युकेशन जॉब्स

Small Business Idea : पीएम मोदी प्रमोट करत असलेला हा फक्त 5000 रुपयांत सुरु होणारा व्यवसाय कोणता? जाणून घ्या सविस्तर

धनश्री भावसार-बगाडे

PM Narendra Modi's Jan Aushadhi Kendra Business Sceam :

जर तुम्ही लहानसा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. या व्यवसायाचं प्रमोशन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून यामुळे हा व्यवसाय तुम्हाला चांगले पैसे कमवून देऊ शकतो.

याविषयी पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर घोषणा केली होती. प्रत्येक भागात जन औषधी केंद्र उघडले जातील असे म्हटले आहे, शिवाय यासाठी सरकार सर्व मदत करेल असे आश्वासनदेखील देण्यात आले आहे.

जन औषधी केंद्र काय आहे? कोण सुरु करू शकतो?

जन औषधी केंद्र एक प्रकारचे मेडिकल स्टोअर आहे. ज्यात आपल्याला आवश्यक असलेले सर्व प्रकारचे औषधे मिळतात. जर तुमच्याकडे डी फार्म किंवा बी फार्मची डिग्री असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. किंवा हे लायसन्स मिळवण्यासाठी ही पदवी असणाऱ्या व्यक्तीस नियुक्त करावे.

फक्त ५००० रुपयांमध्ये तुम्हाला हे लायसन्स मिळू शकते. हे स्टोअर टाकण्यासाठी तुम्हाला १२० स्केअर फीट जागा असणे आवश्यक आहे. ही जागा तुमची स्वतःची किंवा भाड्याने घेतली तरी चालते.

या केंद्रातून औषध खरेदीचे फायदे

कमी किंमतीत उच्च गुणवत्ता असलेली औषधे पुरवण्यासाठी या केंद्राची स्थापना देशात सगळीकडे करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये बाजारात मिळणाऱ्या औषधांपेक्षा ५० ते ९० टक्के स्वस्तात औषधे मिळतील. ज्यामुळे कमी पैशात उच्च गुणवत्तेची औषधे मिळतील.

व्यावसायिकाला साधारण किती उत्पन्न मिळेल?

इतर मेडिकल दुकानांच्या तुलनेत येथील औषधे कमी दरात असल्याने उत्पन्नसुद्धा तुलनेने कमी असेल. पण औषधाव्यतिरीक्त इतर गोष्टी जसे प्रोटीन पावडर, सप्लिमेंट्स विकून चांगले पैसे कमवता येतील.

याशिवाय हॉस्पिटल जवळ दुकान करून किंवा घरपोच औषध सेवा देऊन जास्त पैसे कमवू शकतात. सध्या देशात १० हजारपेक्षा जास्त पीएम जन औषधी केंद्र (PMJAK) यशस्वीरित्या सुरू आहेत.

पीएम जन औषधी केंद्रासाठी अप्लाय करण्यासाठी खालील लिंकवर जा.

Pharmaceuticals & Medical Devices Bureau of India (janaushadhi.gov.in)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

SCROLL FOR NEXT