Indian Navy
Indian Navy 
एज्युकेशन जॉब्स

इंडियन नेव्ही जॉब्स : 710 ट्रेड्‌समन भरती परीक्षा ऍडमिट कार्ड जाहीर ! ही घ्या थेट लिंक

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : भारतीय नौदल (इंडियन नेव्ही)ने मुंबई क्षेत्रासाठी भारतीय नेव्ही ट्रेड्‌समॅन मेट परीक्षा 2021 साठी ऍडमिट कार्ड जारी केले आहे. भरती परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार परीक्षेच्या 72 तासांपूर्वी अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वरून हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. 

11 एप्रिल 2021 रोजी मुंबई क्षेत्रासाठी भारतीय नौसेना नागरी परीक्षा (इंडियन नेव्ही सिव्हिलियन एक्‍झामिनेशन टेस्ट) (आयएनसीईटी) - टीएमएम 2021 घेण्यात येईल, ज्यासाठी ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक खाली देण्यात आली आहे. 

INCET-TMM 2021 ऍडमिट कार्ड डाउनलोड कसे करावे? 

  • टप्पा 1 : Joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. 
  • टप्पा 2 : मेन पेजवरील "जॉईन नेव्ही' सेक्‍शनवर जा. 
  • टप्पा 3 : येथे "'ways to join' आणि 'Civilian' व 'Tradesman Mate (TMM)' लिंकवर क्‍लिक करा. 
  • टप्पा 4 : आता खाली असलेल्या "ऍडमिट कार्ड' लिंकवर क्‍लिक करा. 
  • टप्पा 5 : आपले हॉल तिकीट तपासण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख दाखल करा. 
  • टप्पा 6 : ऍडमिट कार्ड स्क्रीनवर उघडेल. ते डाउनलोड करा आणि एक प्रिंटआउट घ्या व आपल्याकडे ठेवा. 

भारतीय नौदलात भरतीसाठी आहेत इतकी पदे 
या भरती मोहिमेद्वारे एकूण 1,159 ट्रेड्‌समन मेट रिक्त जागा भरल्या जातील. यापैकी 710 पदे ईस्टर्न नेव्हल कमांडसाठी, 324 वेस्टर्न नेव्हल कमांडसाठी तर 125 पदे साउथ नेव्हल कमांडसाठी आहेत. 

"या' केंद्रांवर घेतली जाणार नाही परीक्षा 
अखिल भारतीय परीक्षा मार्चमध्ये घेण्यात आली होती; परंतु कोरोना विषाणू (कोव्हिड-19) साथीच्या रोगामुळे मुंबई, पुणे आणि नागपूरमधील परीक्षा केंद्रे बंद राहतील. कोरोनाची अधिक प्रकरणे नोंदल्यामुळे या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. 

परीक्षेचा पॅटर्न 
भारतीय नौदलाच्या ऑनलाइन परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड, जनरल इंग्लिश अँड कॉम्प्रहेन्शन अँड जनरल अवेअरनेस या विषयांमधून प्रश्न विचारले जातील. पेपर एकूण 100 गुणांचा असेल, तर प्रत्येक विषयासाठी 25 मार्क्‍स असतील. 

निवड प्रक्रिया 
भारतीय नौदलानुसार, ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची नेमणूक कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय परीक्षा आणि इतर आवश्‍यक पडताळणीच्या आधारे तात्पुरत्या निवडीसाठी प्राधान्याने गुणवत्ता यादीवर तयार केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क; नवीन आदेश 'या' तारखेपासून लागू

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT