JEE Main 2021 
एज्युकेशन जॉब्स

जेईई मेन मार्च 2021 : मार्च सत्राची फायनल ऍन्सर की जाहीर ! निकाल लवकरच होईल जाहीर

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) 24 मार्च 2021 रोजी जेईई मेन 2021 चे फायनल ऍन्सर की जाहीर केली आहे. जे उमेदवार या परीक्षेत सहभागी झाले आहेत ते jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतात. फायनल ऍन्सर कीच्या आधारे जेईई मेन्स 2021 चा निकाल या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित आहे. 

प्रोव्हिजनल ऍन्सर की 20 मार्च रोजी एनटीएच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली गेली. प्रोव्हिजनल ऍन्सर की विरोधात हरकत घेण्याची शेवटची तारीख 22 मार्च होती. 

जेईई मेन मार्च 2021 फायनल ऍन्सर की असे डाउनलोड करा 

  • स्टेप 1 : या परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी प्रथम जेईई jeemain.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी. 
  • स्टेप 2 : वेबसाइटवर दिलेल्या JEE (मेन) मार्च 2021 फायनल ऍन्सर की लिंकवर क्‍लिक करा. 
  • स्टेप 3 : लिंकवर क्‍लिक केल्यावर ऍन्सर की उमेदवाराच्या समोर असेल, ते डाउनलोड करा किंवा पुढील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या. 

ऍन्सर की पीडीएफ स्वरूपात डाउनलोड केली जाऊ शकते. उमेदवार ऍन्सर की वरून प्रत्येक प्रश्नासाठी योग्य उत्तरे तपासू शकतात आणि संभाव्य स्कोअरचा अंदाज लावू शकतात आणि त्यांच्या उत्तराशी ताळमेळ घालू शकतात. मार्चमध्ये 6.21 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर एप्रिलच्या सत्राची रजिस्ट्रेशन विंडोही खुला होईल. एनटीएतर्फे एप्रिल आणि मेमध्ये आणखी दोन सत्रांत प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake RTO Website: अवघ्या सात रुपयांमध्ये डुप्लिकेट आरसी बुक! आरटीओच्या बनावट वेबसाइट प्रकरणातील धक्कादायक प्रकार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण’ योजना बंद नाही; काहींना लखपती करणार : मुख्यमंत्री फडणवीस

Supreme Court : मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संपत्तीत हिस्सा देण्यास नकार, सुप्रीम कोर्टानेही वडिलांची दिली साथ; नेमकं काय घडलं?

Shocking : विमान कोसळले! दिग्गज खेळाडूसह कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू, पाच वर्षांचा मुलगा अन् १४ वर्षांची मुलगी आगीच्या तांडवात सापडले

...तर मराठा समाज राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करेल: राज्य समन्वयक महेश डोंगरे; धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून ‘मराठा क्रांती’चा इशारा

SCROLL FOR NEXT