Air Force 
एज्युकेशन जॉब्स

इंडियन एअरफोर्सने केली एक्‍स आणि वाय ग्रुप भरती परीक्षेच्या तारखांची घोषणा ! जाणून घ्या संपूर्ण तपशील

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : केंद्रीय वायुसेना निवड मंडळाने (सेंट्रल एयरमैन सिलेक्‍शन बोर्ड) नुकतीच भारतीय वायुसेनेच्या एक्‍स आणि वाय समूहाच्या भरती परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, 18 ते 22 एप्रिल 2021 पर्यंत ही भरती परीक्षा विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसणारे उमेदवार परीक्षेच्या 48 तास आधी अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) डाउनलोड करू शकतील, अशी माहिती मंडळाने जारी केली आहे. या पदांसाठी जानेवारी 2021 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. 

अशा प्रकारे केली जाईल उमेदवारांची निवड 
अधिसूचनेनुसार, या पदांची निवड ऑनलाइन परीक्षा, शारीरिक चाचणी व वैद्यकीय तपासणीनंतर केली जाईल. ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना पुढील भरती प्रक्रियेसाठी बोलविण्यात येईल. या तीन परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची या पदांसाठी निवड केली जाईल. 

प्रवेशपत्र डाउनलोड कसे कराल? 
परीक्षेसाठी अर्ज भरलेले उमेदवार भरती मंडळाच्या https://airmenselection.cdac.in/CASB च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. यासाठी त्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल. या वेबसाइटवर त्यांना परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती मिळेल. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवाराने त्यावर दिलेली मार्गदर्शक सूचना पूर्ण वाचली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT