Sports Canva
एज्युकेशन जॉब्स

भारतीय क्रीडा प्राधिकरण करतेय विविध पदांची भरती !

भारतीय क्रीडा प्राधिकरण करत आहे विविध पदांची भरती

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : सहाय्यक प्रशिक्षकांच्या भरतीसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणकडून (स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया) (Sports Authority Of India) अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास आज (गुरुवारी) शेवटची संधी आहे. वेगवेगळ्या खेळांशी संबंधित ही सहाय्यक प्रशिक्षक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत. करार चार वर्षांचा असेल. (Sports Authority of India is recruiting for various posts)

अर्जदार या पदांसाठी तीन श्रेणींमध्ये अर्ज करू शकतात. यामध्ये अर्जदार स्पोर्टस्‌ अथॉरिटी ऑफ इंडिया, एनएस आणि एनआयएसचे कोचिंग डिप्लोमा असणे आवश्‍यक आहे. या पदांसाठी इतर कोणत्याही विद्यापीठ किंवा परदेशी विद्यापीठाचे कोचिंग पदविकाधारक अर्ज करू शकतात. ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतलेला एखादा खेळाडू किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षकही त्यासाठी अर्ज करू शकतो. अर्जदार 20 मे 2021 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.

या पदांसाठी होणार भरती

  • तिरंदाजी (आर्चरी) : 13

  • ऍथलेटिक्‍स : 20

  • बॉक्‍सिंग : 13

  • हॉकी : 13

  • शूटिंग : 03

  • वेटलिफ्टिंग : 13

  • कुस्ती : 13

  • सायकलिंग : 13

  • फेसिंग : 13

  • ज्यूदो : 13

  • रोईंग : 13

  • पोहणे : 07

  • टेबल टेनिस : 07

  • बास्केटबॉल : 06

  • फुटबॉल : 10

  • जिम्नॅस्टिक्‍स : 06

  • हॅंडबॉल : 03

  • कबड्डी आणि खो खो : 07

  • कराटे : 04

  • कायकिंग आणि कॅनोइंग : 06

  • गेम स्पेक्‍ट टेक्रा : 05

  • सॉफ्टबॉल : 01

  • तायक्वांदो : 06

  • व्हॉलिबॉल : 06

  • वुशू : 06

अर्जदार या वेबसाइटवर अर्ज करू शकतात

या पदांविषयी अधिक माहितीसाठी अर्जदार एसएआय वेबसाइटला भेट देऊ शकतात. याशिवाय या पदांसाठी ऑनलाइन अर्जही करू शकतात. www.sportauthorityofindia.nic.in. या वेबसाइटला भेट देऊन अर्जदार अर्ज करू शकतात. अर्जदारांना 20 मे 2021 पूर्वी अर्ज करणे अनिवार्य असेल. त्यानंतर अर्ज करण्याची कोणतीही संधी दिली जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT