Rajyasabha 
एज्युकेशन जॉब्स

विद्यार्थ्यांनो, राज्यसभेत इंटर्नशिप करण्याची संधी ! स्टायपंडही मिळेल; करा लवकर अर्ज

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय इंटर्नशिप मिळण्याची चांगली संधी आहे. आपल्यासाठी राज्यसभेत इंटर्नशिप रिक्त झाले आहे. तुम्हाला भारतीय संसदेत काम करण्याची संधी मिळत आहे. 

कोण अर्ज करू शकेल? 
राज्यसभा रिसर्च अँड स्टडी (राज्यसभा संशोधन व अभ्यास) (आरएसआरएस) योजनेअंतर्गत ही स्टुडंट एंगेजमेंट इंटर्नशिप संधी अंतर्गत भरती प्रकिया राबविण्यात आली आहे. कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठातून कोणताही यूजी किंवा पीजी अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला दरमहा एक स्टायपंडही देण्यात येईल. 

अर्ज कसा करावा? 
या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या तपशिलासह सर्व आवश्‍यक कागदपत्रे rssei.rsrs@sansad.nic.in या ई-मेलवर पाठवावी लागतील. तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदत आहे. 

स्टायपंडसह इंटर्नशिप किती असेल? 
या इंटर्नशिपचा कालावधी दोन महिन्यांचा असेल. एकूण 10 विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड केली जाईल. प्रत्येक इंटर्नला केंद्र सरकारकडून दरमहा दहा हजार रुपये वेतन दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT